शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल व लँडलाइनचा क्रमांक होणार ११ आकड्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:52 IST

ट्रायने मागविल्या हरकती-सूचना; वाढत्या ग्राहक संख्येमुळे बदल करण्याबाबत विचार सुरू; २१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार सूचना

मुंबई : केंद्रीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय) ने देशातील मोबाइल व फिक्स्ड लाइन (लँड लाइन) दूरध्वनीचे क्रमांक समान असावेत का याबाबत कन्सल्टेशन पेपर जाहीर केला असून याबाबत सूचना व हरकती मागवल्या आहेत. २१ ऑक्टोबरपर्यंत सूचना व त्यावर काही हरकती असल्या तर ४ नोव्हेंबरपर्यंत देता येतील. त्याशिवाय देशातील वाढत्या मोबाइल संख्येमुळे सध्याचे १० आकडी मोबाइल क्रमांक ११ आकडी करण्याच्या प्रस्तावावर देखील सूचना व हरकती मागवल्या आहेत.मोबाइल ग्राहकांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे केवळ इंटरनेट डाटासाठी (डोंगल) वापरले जाणारे १० आकडी क्रमांक यापुढे १३ आकडी करण्याचादेखील विचार मांडण्यात आला आहे. जून २०१९ मध्ये ट्रायने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशातील एकूण ग्राहकांची संख्या ११८ कोटी ६६ लाख आहे व घनतेचे प्रमाण ९०.११ आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून राष्ट्रीय नंबरिंग प्लॅनमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दूरसंचार मंत्रालयाने ५ मे रोजी दिलेल्या शिफारशीप्रमाणे पुरेसे क्रमांक उपलब्ध होण्यासाठी मोबाइल व लँड लाइन क्रमांक समान ठेवण्याबाबत विचार करण्याचा प्रस्ताव दिला होता.जेव्हा देशात केवळ लँड लाइन उपलब्ध होती, त्या वेळी १९९३ मध्ये पहिल्यांदा नॅशनल फंडामेंटल प्लॅन अस्तित्वात आला होता. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या ग्राहक संख्येला लक्षात घेऊन २००३ मध्ये नॅशनल नंबरिंग प्लॅन लागू करण्यात आला. २०३० पर्यंत दूरसंचार सेवेच्या घनतेचे प्रमाण ५० टक्के असेल व ७५ कोटी टेलिफोन ग्राहक असतील. त्यामध्ये ३० कोटी लँडलाइन ग्राहक व ४५ कोटी मोबाइल ग्राहक असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र २००९ मध्येच मोबाइल ग्राहकांची संख्या ४५ कोटींवर गेली. त्या तुलनेत लँडलाइन ग्राहकांच्या संख्येत सातत्याने घट झाली.समान संख्येचा यामुळे विचार सुरू!मोबाइल क्रमांक १० आकड्यांवरून ११ आकडी केल्यास व त्याचा पहिला आकडा ९ ठेवल्यास एकूण क्षमता १० बिलीयनपर्यंत वाढेल. त्यामुळे याबाबत विचार सुरू असून ट्रायने प्रस्तावावर सूचना व हरकती मागवल्या आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइल