Samsul Huda News: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक आमदार दिसत आहे. या आमदाराचे नाव आहे समसुल हुदा! एका कामाच्या भूमिपूजनासाठी आलेले हे आमदार एका व्यक्तीला जवळ खेचतात आणि त्याच्या कानशिलात लगावत. हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कारणावरून मारहाण केलीये, ते अत्यंत शुल्लक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा व्हिडीओ आहे आसाममधील धुबरी जिल्ह्यातील. या जिल्ह्यात पूर्व बिलासिपारा विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचे आमदार आहेत समसुल हुदा. ते एआयडीयूएफ पक्षाचे आहेत. समसुल हुदा यांना पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजनासाठी बोलवण्यात आले होते. त्याचवेळी ही घटना घडली.
आमदाराने मारहाण का केली?
भूमिपूजन करण्यासाठी त्या जागेवर दोन केळीचे खांब रोवण्यात आलेले होते. आणि दोन्ही खांबांना एक गुलाबी रंगाची फीत बांधलेली होती. फीत कापण्यासाठी आमदार समसुल हुदा तिथे आले आणि ती फीत बघून चिडले.
कारण फीत गुलाबी रंगाची होती. भूमिपूजनाच्या कामासाठी लाल रंगाची फीत का लावली नाही, असे म्हणत आमदार समसुल हुदा चिडले आणि त्यांनी तिथे असलेल्या एका व्यक्तीला खेचले. त्यानंतर ते त्या व्यक्तीच्या कानाखाली मारतात.
त्यांचा राग इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांनी रोवलेल्या केळीच्या खांबांपैकी एक खांब उपटला. केळीच्या खांबानेच आमदाराने त्या व्यक्तीला मारहाण करायला सुरूवात केली. समसुल हुदा हे आमदार असल्याने आजबाजूचे लोक फक्त बघत राहिले.
आमदारने मारहाण कशी केली, व्हिडीओ पहा
आमदाराने केलेल्या या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अत्यंत शुल्लक कारणावरून आमदाराने सर्वसामान्य माणसाला मारहाण केल्याबद्दल लोक संताप व्यक्त करत आहेत.