शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:14 IST

MLA Raja Singh: भाजप आमदार कुठल्याही सुरक्षेविना संवेदनशील भागाचे दौरे करत आहेत.

MLA Raja Singh: तेलंगणा राज्यातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ठाकूर राजा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे नाही, तर जीवाला धोका असल्यामुळे चर्चेत आले आहेत. राजा सिंह सुरक्षेशिवाय संवेदनशील भागाचे दौरे करतात, त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून, त्यात बुलेटप्रूफ वाहन आणि सुरक्षा कर्मचारी (१+४) वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

राजा सिंह यांना नोटीस मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगलहाट पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार ठाकूर राजा सिंह यांना औपचारिक नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये, त्यांना सरकारने दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, विशेषतः ज्या भागात सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील परिस्थिती आहे.

बुलेटप्रूफ वाहन वापरण्याची विनंती...१ जून रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सहकार्य करणे ही आमदाराची जबाबदारी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ वाहन वापरण्याची आणि सरकारने पुरवलेल्या (१+४) सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सक्तीने वापर करण्याची विनंती करण्यात येत आहे.

अत्यंत संवेदनशील भागात गेलेपोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदार राजा सिंह यांना वारंवार धमकीचे फोन येत आहेत. असे असूनही, ते बुलेटप्रूफ वाहन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय संवेदनशील भागात जात आहेत. ३१ मे रोजी संध्याकाळी ५:०० ते ७:०० वाजेच्या दरम्यान राजा सिंह यांनी तलबकट्टा, भवानी नगर, इंजिनबोली, बाबा नगर, बहादुरपुरा, संतोष नगर, याकुतपुरा, गोलकोंडा आणि जिरा यासारख्या भागांना भेट दिली.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारTelanganaतेलंगणा