शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 14:47 IST

'माझ्या जिवाला धोका असून भाजपा आणि आरएसएस माझा काटा काढू शकतात' अशी भीती गुजरातमधील आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली: 'माझ्या जिवाला धोका असून भाजपा आणि आरएसएस माझा काटा काढू शकतात' अशी भीती गुजरातमधील आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे. 'माझ्या मनातही विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्याप्रमाणे भीती आहे. काही लोकं माझी हत्या करू शकतात, भाजपा आणि आरएसएसचे लोकं मला मारू शकतात. त्यांच्या मार्गातून माझा काटा ते काढू शकतात अशी माहिती मला मिळाली आहे' असं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जिग्नेश मेवाणींनी म्हटलं आहे.   गुजरातच्या शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. काल एक व्यक्ती माझ्या घरात घुसला व माझं एन्काऊंटर करण्याचं षडयंत्र असल्याचं मला सांगितलं. 10 वर्षांपूर्वीची जुनी प्रकरणे उकरुन काढून मला त्यामध्ये मला गोवण्याचा डाव आहे. आयबीच्या माध्यमातून मला धमकावण्याचा प्रयत्न होतोय. मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला.मागच्या काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मी हिंदू एकतेसाठी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन. मी मरणाला अजिबात घाबरत नाही असे प्रवीण तोगाडिया म्हणाले. या पत्रकार परिषदेदरम्यान भावून झालेल्या तोगाडिया यांना रडू कोसळले. त्यानंतर पाटीदार समाजाचे नेता हार्दिक पटेल यांनी तोगडियांची भेट घेतली. तोगडियांची भेट घेतल्यानंतर हार्दिक पटेलनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी आणि शहा हे प्रवीण तोगडियांविरोधात कट रचत आहेत असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने यावेळी केला.'तोगडियांच्या विरोधात कट रचला जात आहे, हा कट दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी रचला आहे. तोगडिया आणि आम्ही शेतक-यांच्या हिताचे मुद्दे उचलतो म्हणून आम्हाला लक्ष्य केलं जात आहे' असं पटेल यावेळी म्हणाले. 'विद्यमान भाजपा सरकार तोडगियांना त्रास देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावरून तोगडियांना मोदी-शहा त्रास देत आहेत , सर्वांना माहीत आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा या कटामागे हात आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तोगडिया यांच्या विरोधात आहे, हे आता लपून राहिलेले नाही' असं हार्दिक पटेल पुढे म्हणाले. 

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघpraveen togadiaप्रवीण तोगडिया