शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 09:27 IST

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली

नवी दिल्ली : शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याविषयी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाचा आदर करायला हवा होता, अशा शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीव्र रोष व्यक्त केला. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आता एक आठवड्याच्या आत कालमर्यादा स्पष्ट करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली. आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही गटांकडून एकूण ३४ याचिका प्रलंबित असून त्या एक आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांपुढे ठेवण्यात याव्या आणि त्यावर विधानसभा अध्यक्षांनी निश्चित कालावधीत कार्यवाही करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या ११ मे च्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केले अशी विचारणा करीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर तीव्र रोष व्यक्त केला. याप्रकरणी पुढील सुनावणी दाेन आठवड्यानंतर निश्चित करण्यात आली आहे. 

घाई नाही, दिरंगाईही नाही : राहुल नार्वेकर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी घेण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही तसेच त्यासाठी घाईसुद्धा केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आमदार अपात्रतेच्या कारवाईसाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. मात्र जे नियमानुसार आहे तेच केले जाणार आहे, असे राहूल नार्वेकर म्हणाले.

‘उत्तरानंतरही कारवाई नाही’विधानसभा अध्यक्षांपुढे शिंदे गटाने दीड वर्षानंतर सहाशे पानांचे उत्तर दाखल केले. पण त्यानंतर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. हा ‘फार्स’ असल्याचे सिब्बल म्हणाले. आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात अध्यक्षांना तीन महिन्यांमध्ये निर्णय घ्यावा लागतो, असे न्या. रोहिंग्टन नरीमन यांच्या निकालाचा हवाला देत सिब्बल यांनी सांगितले. मेहता यांनी फार्स शब्दावर आक्षेप घेतला. 

पक्ष आणि चिन्हावर तीन आठवड्यांनंतर सुनावणीशिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाविषयी तीन आठवड्यांनंतर सोमवारचा दिवस सोडून सुनावणी करण्यात येईल. या याचिकेवरही आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या सुनावणी होणार होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Narvekarराहुल नार्वेकर