लिकेजसाठी एमजेपीकडे ८ महिने खेटे दुषित पाणी : नागरिकांच्या आरोग्याला धोका

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:19+5:302015-02-14T23:51:19+5:30

लातूर : शहरातील लाहोटी कंपाऊंड परिसरातील कस्तुरी नगर भागात वर्षभरापासून मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने आठवड्याला हजारो लिटर्स पाणी वाया जाते़ लिकेज बंद करण्यात यावा, या मागणीसाठी येथील नागरिकांनी तब्बल आठ महिन्यांपासून एमजेपीकडे पाठपुरावा करूनही कर्मचार्‍यांनी ठंेगा दाखविला आहे़ टंचाईच्या काळात पाणी वाचविण्याची गरज निर्माण झालेली असताना लिकेज रोखण्यासाठी एमजेपीचे दुर्लक्ष नेमके कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे़

MJP for 8 months Khasi Pure Water: The risk of citizens' health | लिकेजसाठी एमजेपीकडे ८ महिने खेटे दुषित पाणी : नागरिकांच्या आरोग्याला धोका

लिकेजसाठी एमजेपीकडे ८ महिने खेटे दुषित पाणी : नागरिकांच्या आरोग्याला धोका

तूर : शहरातील लाहोटी कंपाऊंड परिसरातील कस्तुरी नगर भागात वर्षभरापासून मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने आठवड्याला हजारो लिटर्स पाणी वाया जाते़ लिकेज बंद करण्यात यावा, या मागणीसाठी येथील नागरिकांनी तब्बल आठ महिन्यांपासून एमजेपीकडे पाठपुरावा करूनही कर्मचार्‍यांनी ठंेगा दाखविला आहे़ टंचाईच्या काळात पाणी वाचविण्याची गरज निर्माण झालेली असताना लिकेज रोखण्यासाठी एमजेपीचे दुर्लक्ष नेमके कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
कस्तुरी नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून जलवाहिनी लिकेज झाल्याने गटारीचे पाणी नळाला येते़ ड्रेनेजचे पाणीही नळातून येत असल्याने दुषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे़ याबाबत येथील नागरिकांनी एमजेपी, मनपा आयुक्तांनाही निवेदन दिले़ तसेच या भागातील एमजेपीचे अभियंता भंडारी यांनाही अनेकदा माहिती दिली़ शिवाय, स्थानिक नगरसेवकांनाही माहिती देऊन लिकेज बंद करण्यात आले नाही़ अगोदरच पाणीटंचाईचे चटके सहन करणार्‍या नागरिकांच्या आरोग्याशी एमजेपीने खेळ मांडला असल्याचा आरोप रमेश शेठ यांनी केला़

अभियंत्याची टोलवाटोलवी़़़़
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचे अभियंता भंडारी यांना लिकेजची माहिती अनेकदा दिली़ पाणी सुटल्यावर सूचना द्या, आम्हाला एवढेच काम आहे का,अशी उडवाउडवीची उत्तरे देतात़ अनेकदा तक्रार करूनही ते कधी कधी बोलायला तयार नसतात, असा आरोप रमेश शेठ यांनी केला़

नागरिकांनी केली पाईपालाईऩ़़
नगर परिषद असताना कस्तुरी नगर भागात तीनवेळा पाईपलाईनसाठी निविदा काढण्यात आली होती़ ती कोणीच घेतली नाही़ अखेर इथल्या तीन जणांनी टंचाई वाढल्याने एकत्रित येऊन स्वत:हून काम केले़ इथल्या नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करावा लागला आहे़ आता वर्षभरापासून जलवाहिनी लिकेज झाली, दर आठवड्याला हजारो लिटर्स पाणी वाया जात असल्याचे सांगूनही एमजेपीचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड होत आहे़

Web Title: MJP for 8 months Khasi Pure Water: The risk of citizens' health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.