शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मिझोरममध्ये ‘झेडपीएम’चे आव्हान अन् दारूबंदी शिथिलतेचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 4:22 AM

सत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.

- असिफ कुरणेसत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसलामिझो नॅशनल फ्रंटसोबत झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) आघाडीने तगडे आव्हान दिले. जवळपास २०पेक्षा जास्त मतदारसंघांत एमएनएफ विरुद्ध झेडपीएम यांच्यात मुख्य लढत झाली. काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली.सलग दोन टर्म मुख्यमंत्री पदावर असलेल्या लालथनहवला यांच्याविरोधात लोकांमध्ये असंतोष होता. दारूबंदी शिथिल करण्याचा निर्णय, शवपेट्यांचे वाढलेले भाव, पेट्रोलच्या किमती या मुद्द्यांबरोबर मिझो नॅशनल फ्रंटने दशकापेक्षा जास्त काळापासून अडगळीत पडलेल्या मिझो राजकारणाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हवा दिली होती. त्यांचा त्यांना फायदा होत असल्याचे दिसते.ख्रिश्चनबहुल मतदार असलेल्या राज्यात चर्च आणि ख्रिश्चन मिशनरी, नागरी संघटनांचे प्रभुत्व असलेल्या ठिकाणी त्यांचा विरोध डावलत काँग्रेसने अनेक वर्षांपासून सुरू असलेली दारूबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काँग्रेसच्या अंगलट आल्याचे निकालातून दिसते. येथील पराभवाने ईशान्येकडील काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला देखील ढासळला आहे. हिंदी भाषिक राज्यात काँग्रेसने भाजपला चांगली टक्कर देत यश मिळवले असले तरी पारंपरिक बालेकिल्ल्यात मात्र पराभव पत्करावा लागला.निकालाची कारणे...झेडपीएम आघाडीने अनपेक्षितरीत्या राजधानी ऐझॉलमध्ये मारलेली मुसंडी अनेकांना धक्का देणारी ठरली.ब्रू समाजाच्या मतदानाविरोधात काँग्रेसने भूमिका घेत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.कमी मतदार असलेल्या मतदारसंघात चौरंगी लढतीचा फटका काँग्रेसला बसला.

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018Mizo National Frontमिझो नॅशनल फ्रंटMizoram Nationalist Partyझोरम नॅशनॅलिस्ट पार्टीMizoram People's Conferenceमिझोराम पीपल्स कॉन्फरन्सcongressकाँग्रेसBJPभाजपा