दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही : सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:41 IST2025-12-22T06:40:50+5:302025-12-22T06:41:04+5:30
कोलकाता : दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे रा. स्व. संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ...

दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही : सरसंघचालक मोहन भागवत
कोलकाता : दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे रा. स्व. संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले.
संघाच्या शताब्दीनिमित्त पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, संघाचा कोणीही शत्रू नाही. मात्र संघाचे काम आणखी विस्तारले तर स्वार्थी, संकुचित हेतूने कार्यरत असलेल्या काही लोकांची दुकाने बंद होतील. हिंदूंची शक्ती जागृत होत आहे. त्यामुळेच वाईट प्रवृत्तीचे लोक चिंताग्रस्त झाले आहेत. (वृत्तसंस्था)
स्थानिकांचे उत्पन्न वाढेल अशाच गोष्टी खरेदी करा
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, लोकांनी घरात बनवता येणाऱ्या वस्तू खरेदी करू नयेत. तसेच स्थानिकांचे उत्पन्न वाढेल अशाच गोष्टी प्राधान्याने खरेदी कराव्यात. राष्ट्रहितासाठी स्वदेशीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.