शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य न करणं ही चूक; भाजपा खासदाराची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:46 IST

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात.

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा फटका शिवसेना-भाजपा युतीला बसला. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाला त्यामुळे राज्यात भाजपाला सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रासारखं राज्य भाजपाच्या हातून निसटलं. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता आणली. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही भाजपाची चूक होती अशी कबुली भाजपाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिली आहे. 

न्यूज १८ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले की, शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र होतो. शिवसेनेला दूर करणे योग्य झालं नाही. जुन्या मित्रपक्षाला टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. शिवसेनेने आमची साथ सोडली असं त्यांनी बोलून दाखविले. 

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात. मागील आठवड्यात त्यांनी घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन भाजपा सरकारला घरचा आहेर दिला होता. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते. 

'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. भाजपा खासदारानं पक्षालाचा इशारा देत सांगितलं होतं की, देशातली आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्याचा फटका भाजपाला दिल्ली आणि झारखंडच्या निवडणुकीत बसणार आहे. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भाजपाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते अशी टीका त्यांनी केली होती.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री