शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:11 IST

महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले.

मेरठ/बिजनोर -  महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले.कंवरपाल सिंह (५५) असे त्याचे नाव आहे. त्याची शेवटची नियुक्ती ही बिजनोर बधापूर पोलीस ठाण्यात होती. १५ नोव्हेंबर रोजी सिंह महिनाभराच्या रजेवर गेला. तो उत्तर प्रदेश प्रॉव्हिन्शियल आर्मड् कॉन्स्टॅब्युलरचा (पीएसी) माजी कर्मचारी. २२ मे १९८७ रोजी मेरठच्या हाशीमपुरा भागात ४२ मुस्लिम पुरुषांच्या झालेल्या हत्याकांडात त्याच्यासह १५ जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ४२ मुस्लिमांना गोळ्या घालून ठार मारून मेरठच्या कालव्यात फेकून देण्यात आले होते. १९ पीएसी जवानांना (त्यातील तिघांचा ३१ वर्षे चाललेल्या खटल्यात मृत्यू झाला) खालच्या न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. हा निर्णय न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि विनोद गोयल यांनी फिरविला व ते ठरवून केले गेलेले मुस्लिमांचे हत्याकांड होते, असे म्हटले. (वृत्तसंस्था)न्यायमूर्तींनी दोषी ठरलेल्यांच्या शिक्षेबद्दल करण्यात आलेल्या युक्तिवादाला प्रतिसाद न देता त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा सुनावली.३१ आॅक्टोबर, २०१८ रोजीच्या आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने दोषींना २२ नोव्हेंबरपर्यंत शरण येण्याचा आदेश दिला होता. ही मुदत कंवरपाल सिंह रजेवर जाण्याच्या नेमका एक आठवडा आधीची होती. साडेतीन महिन्यांनंतरही सिंह कामावर रुजू झाला नाही व सेवेचा भंग केला म्हणून बिजनोर पोलिसांनी त्याला १ एप्रिल, २०१९ रोजी निलंबित केले. तो हत्याकांडात दोषी ठरला आहे, याची बिजनोर पोलिसांना काही माहितीच नव्हती. त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. त्या अहवालावरून बिजनोरच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला गेल्या आठवड्यात सेवेतून बडतर्फ केले. 

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिस