शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे गैरवर्तन, नायडूंच्या डोळ्यांत अश्रू; संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:24 IST

नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती.

हरिश गुप्ता -

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी केलेल्या गैरवर्तन व गदारोळाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी नायडू खूप भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळून ते काही सेकंद बोलू शकले नाहीत. राज्यसभेतील सदस्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे अस्वस्थ होऊन मी रात्रभर झोपू शकलो नाही असेही ते म्हणाले. विरोधकांच्या गदारोळाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार होते. नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती. मात्र त्याऐवजी कृषीविषयक समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यास मंगळवारी संमती देण्यात आली. या निर्णयाचा निषेध करताना काही विरोधी सदस्य राज्यसभेत जिथे पत्रकार, अधिकारी बसतात, त्या टेबलांवर चढून घोषणा देऊ लागले. एका खासदाराने कामकाजातील एक फाईल सभापतींच्या दिशेने भिरकावली होती. राज्यसभेचे बुधवारी कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सभापतींचे आसन व त्याजवळील भाग हा एक प्रकारे राज्यसभेचा गाभारा आहे. त्यासहित सर्व सभागृहाचे पावित्र्य खासदारांनी कायम राखले पाहिजे. 

अपेक्षेइतके काम नाहीलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत जितके काम होणे अपेक्षित होते तितके होताना दिसत नाही. या अधिवेशनात काळात आतापर्यंत या सभागृहाचे फक्त २२ तासच काम झाले आहे. विरोधकांच्या गदारोळाचे कारण देऊन लोकसभेचे कामकाज ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केले.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस