मीरा बोरवणकर बीपीआरच्या महासंचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 23:25 IST2016-04-08T23:25:25+5:302016-04-08T23:25:25+5:30
महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी मीरा सी. बोरवणकर यांची शुक्रवारी पोलीस संशोधन आणि विकास (बीपीआर अॅन्ड डी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

मीरा बोरवणकर बीपीआरच्या महासंचालक
नवी दिल्ली : महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी मीरा सी. बोरवणकर यांची शुक्रवारी पोलीस संशोधन आणि विकास (बीपीआर अॅन्ड डी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या १९८१ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मुंबई गुन्हेशाखेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारितील कार्मिक विभागाने बोरवणकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. पदभार स्वीकारतील त्या दिवसांपासून ३० सप्टेंबर २०१७ रोजी निवृत्त होईपर्यंत त्या पदभार सांभाळतील. बोरवणकर यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने ठेवल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीसंबंधी समितीने त्याला मंजुरी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)