सोन्याच्या भावात किरकोळ सुधारणा
By Admin | Updated: December 12, 2014 23:58 IST2014-12-12T23:58:52+5:302014-12-12T23:58:52+5:30
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 1क् रुपयांच्या किरकोळ सुधारणोसह 27,31क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला.

सोन्याच्या भावात किरकोळ सुधारणा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 1क् रुपयांच्या किरकोळ सुधारणोसह 27,31क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. जागतिक बाजारात घसरणीचा कल असतानाही स्थानिक सराफा व्यापा:यांनी लग्नसराईची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने खरेदी केल्याने ही वाढ नोंदली गेली आहे. चांदीचा भावही 36क् रुपयांनी उंचावून 38,56क् रुपये प्रतिकिलो राहिला.
व्यापा:यांनी सांगितले की, रिटेलर्स व आभूषण निर्मात्यांनी लग्नसराईची खरेदी केल्याने सोन्याच्या भावाही काहिशी सुधारणा दिसून आली आहे. तथापि, जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने या खरेदीला मर्यादा राहिल्या. तेल दरातही घसरणीचा कल आहे.
सिंगापूर येथे मर्यादित उलाढालीमुळे सोन्याचा भाव क्.8 टक्क्यांनी घसरुन 1,217.5क् डॉलर प्रतिऔंस झाली. चांदीचा भावही क्.5 टक्क्यांनी कोसळून 17.क्1 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. राजधानी दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 1क् रुपयांच्या किरकोळ सुधारणोसह अनुक्रमे 27,31क् रुपये व 27,11क् रुपये प्रति 1क् ग्रॅम राहिला. यात काल 17क् रुपयांची कपात झाली होती. तथापि, मर्यादीत व्यवहारामुळे आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 23,8क्क् रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव 36क् रुपयांनी सुधारुन 38,56क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलीव्हरीचा भाव 33क् रुपयांनी वाढून 38,2क्क् रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 63,क्क्क् रुपये व विक्रीकरता 64,क्क्क् रुपयांवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)