खुनात सात वर्षे कारावास

By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:14+5:302014-12-16T23:44:14+5:30

सहकारी गवंड्याच्या खुनात

Minor imprisonment for seven years | खुनात सात वर्षे कारावास

खुनात सात वर्षे कारावास

कारी गवंड्याच्या खुनात
सात वर्षे सश्रम कारावास
नागपूर : गिट्टीखदान चौधरी ले-आऊट येथे आपल्या सहकारी गवंड्याच्या खूनप्रकरणी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडची शिक्षा सुनावली.
११ डिसेंबर रोजी आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते.
भूमेश हरिप्रसाद गिरी (३२), असे आरोपीचे नाव आहे. तो गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गतच्या कोरणी येथील रहिवासी आहे. रतिराम रामाजी बोपचे, असे मृताचे नाव होते.
खुनाची घटना ५ सप्टेंबर २०१३ रोजी घडली होती. पोळ्याच्या पाडव्याचा तो दिवस होता. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मजुरांचे जेवण सुरू असताना रतिराम हा भरपूर दारू पिऊन आला होता. त्याने चक्क भूमेशच्या जेवणाच्या प्लेटमध्ये ओकारी केली होती. त्यामुळे चिडून भूमेशने बल्लीच्या तुकड्याने रतिराम याच्या डोक्यावर प्रहार करून त्याला रक्तबंबाळ केले होते. रात्रभर तो शेडमध्येच मृतावस्थेत पडून होता.
वॉचमन वामन जानबा देशमुख यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १३ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील दीपक कोल्हे तर आरोपीच्या वतीने ॲड. पराग उके यांनी काम पाहिले.

Web Title: Minor imprisonment for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.