अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

By Admin | Updated: July 4, 2016 04:17 IST2016-07-04T04:17:03+5:302016-07-04T04:17:03+5:30

सराईत गुन्हेगाराने दहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची घटना बोल्लारूम भागात उघडकीस आली.

Minor girl murdered after rape | अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून


हैदराबाद : सराईत गुन्हेगाराने दहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची घटना बोल्लारूम भागात उघडकीस आली. बोल्लारूम संशयित आरोपी अनिल कुमार हा नुकताच तुरुंगातून सुटला. तो तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला शनिवारी सायंकाळी जवळच्या दारूच्या दुकानापासून चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेला. मुलगी त्यावेळी तिच्या आईसोबत होती. नंतर त्याने मुलीवर बलात्कार करून तिचा डोक्यात मोठा धोंडा घालून खून केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Minor girl murdered after rape