उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: May 30, 2014 16:55 IST2014-05-30T16:55:36+5:302014-05-30T16:55:36+5:30
आझमगढमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
>ऑनलाइन टीम
आझमगढ, दि. ३० - उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात दोन दलित किशोरवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आझमगढमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराच्या घटना वाढल्याने उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
१५ वर्षीय मुलगी रात्री शौचास घराबाहेर पडली असताना चार जणांनी तिचे तोंड दाबून तिला शेजारच्या नदीकाठी नेले व तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलीला जखमी अवस्थेत तेथेच सोडून पळ काढला. मुलगी घरी परतली नाही म्हणून मुलीच्या घरातील व्यक्तींनी तिची शोधाशोध केली. काही वेळानंतर त्यांना मुलगी बेशुध्दावस्थेत सापडली. मुलींच्या पालकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली तर अन्य तीन जण फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.