शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

गृहराज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांना मिळणार दुसऱ्या राज्यमंत्र्यांकडून फायली; संसदेत चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 6:04 AM

गृहमंत्रालयात निशित प्रामाणिक यांचा दर्जा इतर दोन राज्यमंत्र्यांच्या बरोबरीचा नाही, हे कार्य वाटप आदेशातून स्पष्ट झाले आहे. 

हरीश गुप्तानवी दिल्ली : विनयभंगासह ११ फौजदारी खटल्यांना सामोरे जात असलेले निशिथ प्रामाणिक यांना मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे विरोधकांनी केलेला गदारोळ ताजा असतानाच प्रामाणिक यांना देण्यात आलेले मंत्रीपदाचे अधिकारही आता चर्चेचा विषय झाले आहेत. गृहमंत्रालयातील कार्य वाटपानुसार, राज्यमंत्री प्रामाणिक यांना चक्क दुसऱ्या राज्यमंत्र्यांमार्फत फायली मिळणार आहेत. 

राज्यमंत्री हा कॅबिनेट मंत्र्यास ‘रिपोर्टिंग’ करीत असतो; पण प्रामाणिक यांच्याबाबतीत हा नियम मोडण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. विदित असावे की, प्रामाणिक यांचे नागरिकत्व संशयास्पद असल्यामुळेही संसदेत गदारोळ झाला होता. गृहमंत्री अमित शाह आणि तीन राज्यमंत्री नित्यानंद राय, अजयकुमार मिश्रा व निशित प्रामाणिक अशी गृहमंत्रालयातील सध्याची मंत्री रचना आहे. राज्यमंत्र्यांच्या कार्य वाटप आदेशात नित्यानंद राय यांना १५ खाती, तर अजयकुमार यांना ८ खाती देण्यात आली आहेत. गृहमंत्रालयात निशित प्रामाणिक यांचा दर्जा इतर दोन राज्यमंत्र्यांच्या बरोबरीचा नाही, हे कार्य वाटप आदेशातून स्पष्ट झाले आहे. 

कार्यवाटपात कुणाकडे काय?निशिथ प्रामाणिक यांना मात्र केवळ तीन विभाग देण्यात आले आहेत. सीमा व्यवस्थापन विभाग-१ व विभाग-२ तसेच अधिकृत भाषा विभाग हे ते तीन विभाग होत; पण  गंमत अशी की, यातील पहिले दोन विभाग नित्यानंद राय यांना आणि अधिकृत भाषा विभाग अजयकुमार मिश्रा यांना देण्यात आलेला आहे ! निशित प्रामाणिक यांना या तिन्ही विभागांच्या फायली नित्यानंद राय आणि अजयकुमार मिश्रा यांच्यामार्फत मिळतील, असे कार्य वाटप आदेशात म्हटले आहे. म्हणजेच या तिन्ही विभागांचा कार्यभार दोन-दोन राज्यमंत्र्यांकडे असेल. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालय