शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 13:40 IST

TMC MP Mahua Moitra’s remarks on former CJI : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा  यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

ठळक मुद्देरंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली :  राम मंदिराचा निर्णय आणि तत्कालीन सरन्यायाधीश यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणे, ही गंभीर बाब आहे. याविषयी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या योग्य कारवाई करण्यासाठी विचार केला जात आहे, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सांगितले. (Bringing in ex-CJI and Ram Mandir is serious: BJP mulls action against TMC's Mahua Moitra for expunged remarks)

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा  यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. सोमवारी राष्‍ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्‍तावावर चर्चा करताना महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश यांच्या राम मंदिर निर्णयाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. याला भाजपा सदस्यांनी आणि सरकारकडून विरोध करण्यात आला. मात्र, यानंतरही महुआ मोइत्रा यांनी याचा पुनरुच्चार केला होता. 

रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटले होते. याचबरोबर, महुआ मोइत्रा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, अर्थव्यवस्थेची स्थिती, नवीन कृषी कायदे यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, न्यायव्यवस्था आता पवित्र नाही. याशिवाय, केंद्र सरकारने चुकीची माहिती आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी कुटीर उद्योग बनविला आहे. काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि असत्य याला धैर्य मानतात, असे म्हणत महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राम मंदिराचा निर्णय आणि तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महुआ मोइत्रा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आक्षेप घेत, अशा प्रकाराचा उल्लेख करता येणार नाही, असे सांगितले. तर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी नियमांचा हवाला देत, यावर आक्षेप नोंदविला. 

कोण आहेत महुआ मोइत्रा ?प. बंगालच्या कृष्णानगरमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर महुआ मोइत्रा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी भाजपाच्या कल्याण चौबे यांचा सुमारे ६३ हजार मतांनी पराभव केला. महुआ मोइत्रा यांनी २००८ मध्ये राजकारण प्रवेश केला ते काँग्रेस पक्षातून. मात्र, लवकरच त्या काँग्रेसला कंटाळल्या आणि त्यांनी २०१० मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जींनी त्यांना २०१६ मध्ये करीमपूर विधानसभेचे तिकीट दिले आणि त्या विजयी झाल्या.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाRam Mandirराम मंदिरRanjan Gogoiरंजन गोगोईlok sabhaलोकसभाParliamentसंसद