Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:27 IST2025-05-05T12:26:55+5:302025-05-05T12:27:37+5:30

मध्य प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांना ग्वाल्हेरमधील क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला.

minister narendra shivaji patel got angry after not getting table in gwalior restaurant | Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

मध्य प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांना ग्वाल्हेरमधील क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला. रविवारी रात्री सिटी सेंटर परिसरातील रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झालं आहे, ज्यामध्ये मंत्र्यांचे पीएसओ कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. मंत्र्यांनी फूड सेफ्टी टीमला बोलावलं आणि रात्री नमुने घेतले, त्यानंतर पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाला ताब्यात घेतलं.

विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांच्या धाकट्या मुलाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मंत्री नरेंद्र शिवाजी पटेल ग्वाल्हेरला आले होते. रविवारी रात्री ते त्यांच्या कुटुंबासह क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. रविवारी गर्दीमुळे रेस्टॉरंटमधील सर्व टेबल बुक झाले होते, त्यामुळे मंत्र्यांना वाट पाहावी लागली. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, लोकेंद्र सिंह आणि बुंदेला या दोन फूड सेफ्टी अधिकाऱ्यांनी ५ आणि १० लोकांसाठी टेबल बुक केलं होतं. कर्मचाऱ्यांनी विचारलं की बुकिंग कोणाच्या नावाने केलं आहे, तेव्हा मंत्री संतापले.

मंत्री आणि त्यांचे पीएसओ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये गेले आणि कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. मंत्र्यांनी ताबडतोब फूड सेफ्टी टीमला बोलावलं आणि नमुने घेण्यास सुरुवात केली, जे रात्री ११:१५ वाजेपर्यंत सुरू राहिलं. याच दरम्यान पोलिसांनी रेस्टॉरंट मालक कमल अरोरा यांना ताब्यात घेतलं, परंतु चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

आज तकशी फोनवर बोलताना मंत्री नरेंद्र शिवाजी पटेल म्हणाले, "हे रूटीन चेकिंग होतं. मी जिथे जातो तिथे मी माझ्या विभागाशी संबंधित कार्यालये आणि आस्थापनांची तपासणी करतो. रेस्टॉरंटमधील काही नमुने त्याच वेळी फेल झाले, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. जर कर्मचारी एखाद्या मंत्र्यासोबत असं वागू शकतात, तर ते सामान्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर किती दबाव आणत असतील." 
 

Web Title: minister narendra shivaji patel got angry after not getting table in gwalior restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.