शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यानं लाच म्हणून मागितल्या दोन बॉलिवूड अभिनेत्री; सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 22:31 IST

स्वामींच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळ, बॉलिवूडमध्ये खळबळ

मुंबई: लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची मागणी करणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा सवाल भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केला. याबद्दलची माहिती असल्यास ती द्या, असं आवाहनदेखील त्यांनी ट्विटरवर केलं. त्यामुळे अभिनेत्रींची मागणी करणारा तो मंत्री कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा अभ्यास करत आहे, असं स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'एखाद्या मंत्र्यानं प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री पुरवण्याची मागणी केल्यास त्याच्यावर कोणत्या कायद्याच्या आधारे कारवाई करता येईल? याबद्दल मी अभ्यास करत आहे. काही सूचना असल्यास कळवा. मी संशोधन करत असलेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात त्या कामी येतील,' असं स्वामींनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटमुळे एकच खळबळ माजली आहे.प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री पुरवण्याची मागणी करणाऱ्या मंत्र्याचं नाव स्वामींनी जाहीर केलेलं नाही. स्वामींच्या या ट्विटची राजकीय वर्तुळासोबतच बॉलिवूडमध्येही मोठी चर्चा आहे. स्वामींनी केलेले आरोप अतिशय धक्कादायक असल्याचं ज्येष्ठ वकील आभा सिंह यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. स्वामी या प्रकरणी जेव्हा खटला दाखल करतील, तेव्हा त्याची चौकशी करण्यापेक्षा आताच एफआयआर दाखल करून त्याची योग्य चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सिंह यांनी केली. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाministerमंत्रीbollywoodबॉलिवूड