शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, नेत्यांच्या फोटोंंना बंदी!

By admin | Updated: May 14, 2015 03:48 IST

जनतेच्या पैशातून दिल्या जाणाऱ्या सरकारी जाहिरातींमध्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचा अपवाद वगळता, कोणाही मंत्र्याचे अथवा राजकीय नेत्याचे

नवी दिल्ली: जनतेच्या पैशातून दिल्या जाणाऱ्या सरकारी जाहिरातींमध्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचा अपवाद वगळता, कोणाही मंत्र्याचे अथवा राजकीय नेत्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून सरकारी जाहिरातीच्या बहाण्याने सत्ताधाऱ्यांना राजकीय लाभ होईल, अशा प्रकारच्या जाहिरातबाजीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. ही बंदी आणि निर्बंध केंद्र आणि राज्य सरकारांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, अन्य सरकारी आणि वैधानिक संस्थांना लागू असतील. ‘कॉमन कॉज’ आणि ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट  लिटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थांसह इतरांनी केलेल्या जनहित याचिकांवर न्या. रंजन गोगोई व न्या. पिनाकी चंद्र घोष यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. सरकारी जाहिरातींमध्ये फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान व सरन्यायाधीशांचे फोटा वापरण्यास मुभा देण्यात असली तरी संबंधित जाहिरातीत आपला फोटो वापरावा का याचा प्रसंगोपात्त निर्णय या तिन्ही उच्चपदस्थांनी घ्यावा,असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच राष्ट्रपित्यासारख्या सर्वमान्य व्यक्तींच्या जयंत्या-पुण्यतिथीच्या जाहिरातींमध्ये अर्थातच त्या व्यक्तीचे छायाचित्र असायला हवे, असे न्यायालयाने म्हटले. परंतु म. गांधींखेरीज अशा अन्य सर्वमान्य व्यक्ती कोण हे मात्र मोघम ठेवले. न्यायालयाचा हा आदेश ज्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे दिले जातात अशा सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या दृक््श्राव्य माध्यमांमधील हरतऱ्हेच्या सरकारी जाहिरातींना लागू असेल. मात्र ‘क्लासिफाईड’ या वर्गात मोडणाऱ्या सरकारी जाहिरातींना ही बंधने असणार नाहीत. राजकीय गोटातून विरोध-सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय गोटातून नाराजीचा सूर उमटला आहे. किंबहुना केंद्र सरकारने या विषयावर अजूनही सर्वोच्च न्यायालयाकडे आपली बाजू लावून धरायला हवी, अशी अनेक राजकीय पक्षांची अपेक्षा आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी तर तशी जाहीर मागणीच केली आहे. (विशेष प्रतिनिधी)