शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत ‘सपा’च्या बालेकिल्ल्याला सुरूंग; आझमगड, रामपूर लाेकसभा पाेटनिवडणुकीत भाजपचा विजय, ‘आप’ला संगरुरमध्ये धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 10:31 IST

रामपूर येथून भाजपचे उमेदवार घनश्याम लाेधी यांनी सपाचे आसिम राजा यांचा ४२ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

नवी दिल्ली : देशातील लाेकसभेच्या तीन आणि विधानसभांच्या सात जागांसाठी झालेल्या पाेटनिवडणुकीत भाजपने लाेकसभेच्या दाेन आणि विधानसभेच्या तीन जागांवर विजय मिळविला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा गड मानल्या गेलेल्या रामपूर आणि आझमगड लाेकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवून अखिलेश यादव यांना दणका दिला आहे. तर पंजाबच्या संगरूर लाेकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीला पराभवाचा धक्का बसला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला त्रिपुरा राज्यातच यश मिळाले. रामपूर येथून भाजपचे उमेदवार घनश्याम लाेधी यांनी सपाचे आसिम राजा यांचा ४२ हजारहून अधिक मतांनी पराभव केला. तर आझमगडमध्ये भाजपचे दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांनी सपाचे धर्मेंद्र यादव यांच्यावर जवळपास १० हजार मतांनी विजय मिळविला. आझमगडमध्ये भाजप आणि सपामध्ये चुरशीची लढत झाली. अखेरच्या फेरीची मतमाेजणी हाेईपर्यंत निकाल काेणाच्या बाजूने झुकेल, असे सांगता येत नव्हते. संगरुरमध्ये शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे सिमरनजीत सिंह मान यांनी सुमारे ६ हजार मतांनी निसटता विजय मिळविला. शिराेमणी अकाली दलाच्या कमलदीप काैर राजाेआना, काॅंग्रेसचे दलबीरसिंह गाेल्डी आणि भाजपचे केवलसिंह धिल्लाे यांचे डिपाॅझिट जप्त झाले.

उत्तर प्रदेशात ‘सपा’ला दुफळीचा धक्काउत्तर प्रदेशातील आझमगड व रामपूर हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पार्टीचे बालेकिल्ले मानले जातात. गेल्या निवडणुकीत आझमगडमधून अखिलेश यादव तर रामपूरमधून आझम खान निवडून आले होते. परंतु यावेळी हे दोन्ही मतदारसंघांवर भाजपने कब्जा करून सपाला जोरदार धक्का दिला आहे. बसपाचे गुड्डू जमाली यांनी अडीच लाखांवर मते घेऊन सपाच्या पराभवाला साहाय्य केले. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात नोटाची मते जवळपास १० हजारावर आहे. मुख्यमंत्री माणिक साहा विजयीदेशातील सात विधानसभा पोटनिवडणुकीपैकी भाजपने ३ जागांवर विजय संपादन केला. यात त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. टाऊन बार्डोवाली या मतदारसंघातून साहा निवडून आले. त्रिपुरातील चार विधानसभा पोटनिवडणुकीपैकी ३ जागांवर भाजपने यश संपादन केले. एका जागेवर काँग्रेसने विजय मिळविला.दिल्लीत आपचा करिष्मा कायमदिल्लीतील राजेंद्रनगर विधानसभा पोटनिवडणुकीत आपचे दुर्गेश पाठक यांनी १२ हजारांहून अधिक मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून दिल्लीत अद्यापही आपचा प्रभाव असल्याचे सिद्ध केले आहे. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आपला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न भाजपने केला.  दिल्लीत काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीसुद्धा ही निवडणूक महत्त्वपूर्ण होती. परंतु आपने दिल्लीत  करिष्मा कायम राखला.

संगरुरमध्ये ‘काटे की टक्कर’असेच चित्र संगरुरमध्ये दिसून आले. सिमरनजितसिंह मान यांनी केवळ ५ हजार ८२२ मतांनी ‘आप’चे गुरमेलसिंह यांचा पराभव केला. संगरुरमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले हाेते. त्याच वेळी ‘आप’चा पराभव निश्चित मानला जात हाेता. सिमरनजित सिंग मान यांनी विजय संपादन करून पंजाबच्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याचे संकेत दिले आहेत. शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने खलिस्तानी चळवळ ठरविण्याच्या धोरणाने सिमरनजित सिंग मान यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातले. 

 विधानसभा पोटनिवडणूक    मतदारसंघ    विजयी उमेदवार१.     आत्माकुर (आंध्र प्रदेश)      मेकापट्टी विक्रम रेड्डी        (वायएसआर काँग्रेस)२.     मंदार (झारखंड)      शिल्पी नेहा तिर्की (काँग्रेस)३.    राजेंद्रनगर (दिल्ली)     दुर्गेश पाठक (आप)४.     अगरतळा (त्रिपुरा)      सुदीप रॉय बर्मन (काँग्रेस)५.     जुबराजनगर (त्रिपुरा)      मलिना देबनाथ (भाजप)६.     सुरमा (त्रिपुरा)      स्वप्ना दास पॉल (भाजप)७.    टाऊन बार्डोवाली (त्रिपुरा)     माणिक साहा - (भाजप) लाेकसभा पाेटनिवडणूक१.    आझमगड     दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ (भाजप)२.    रामपूर     घनश्याम लाेधी (भाजप)३.    संगरुर    सिमरनजीत सिंह मान         (शिरोमणी अकाली दल (अमृतसर))

गलिच्छ राजकारणाचा पराभवमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विजयावर ट्विट करून राजेंद्रनगरातील मतदारांचे आभार मानले आहे. राजेंद्रनगरातील या विजयाने दिल्लीच्या लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते, असे ट्विटवर त्यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या लोकांचे प्रेम व स्नेहाचा मी आभारी आहे. लोकांनी भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा या निवडणुकीत पराभव केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAAPआपElectionनिवडणूक