शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

केंद्रीय कर्मचा-यांचे किमान वेतन २१ हजार, सरकार करतेय प्रस्तावावर विचार; भत्तेही वाढणार, पेन्शनधारकांसह सर्वांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:52 IST

केंद्र सरकार केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच खूशखबर देणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर केंद्राने मंजुरीसह शिक्कामोर्तब करताना केंद्रीय कर्मचा-यांचे किमान वेतन दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकार केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच खूशखबर देणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर केंद्राने मंजुरीसह शिक्कामोर्तब करताना केंद्रीय कर्मचा-यांचे किमान वेतन दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती. केंद्र सरकार आता किमान वेतन दरमहा २१ हजार रुपये करण्याच्या विचारात आहे. यासोबतच संरक्षण कर्मचाºयांसह केंद्रीय सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव भत्तेही मिळणार आहेत. आता केवळ सरकारच्या मंजुरीचीची प्रतीक्षा आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ जून रोजी २४ दुरुस्त्यांसह सातव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली होती. आता वाढीव भत्ते १ जुलै २०१७पासून दिले जातील. केंद्रीय कर्मचारी किमान वेतन दरमहा २५ हजार रुपये करण्याची मागणी करीत आहेत. तथापि, सरकार किमान वेतन दरमहा १८ हजार रुपयांऐवजी २१ हजार रुपये करण्याची शक्यता आहे. वेतनवाढ १ जानेवारी २०१६पासून लागू करण्याचा सरकार विचार करीत असल्याचे कळते.वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाचिनमध्ये तैनात जवानांना मिळणारा भत्ता १४ हजार रुपयांवरून दुप्पट म्हणजे ३० हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच अतिजोखमीच्या भागात तैनात अधिकाºयांनाही मिळणारा भत्ता २१ हजार रुपयांवरून ४२ हजार५०० रुपये करण्यात आला आहे. याशिवाय इस्पितळातील शुश्रूषा आणि लिपिक सेवेतीलकर्मचाºयांचा भत्ताही दरमहा ४,८०० रुपयांऐवजी ७,२०० रुपये करण्यात आला आहे. शस्त्रक्रियागारातील सेवेसाठी मिळणारा भत्ताहीदरमहा ५४० रुपये करण्यातआला आहे. मरीन कमांडोजनाआता दरमहा १७,३०० रुपये भत्ता मिळेल.दरम्यान, ओडिशा सरकारनेही २६ सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केलीआहे.३0 हजार ७४८ कोटींचा बोजा-पेन्शनधारकांना मिळणारा वैद्यकीय भत्ताही दुप्पट करण्यात आला आहे. वाढीनुसार तो आता दरमहा पाचशे रुपयांऐवजी एक हजार रुपये करण्यात आला आहे. सुधारित वाढीव भत्त्यांमुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक ३०,७४८.२३ कोटी रुपयांचा बोजा पडेल. जवळपास ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि तेवढ्याच पेन्शनधारकांनाही वाढीव भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.