सीमारेषेवरील भारतीयांना लष्करी प्रशिक्षण
By Admin | Updated: July 2, 2014 11:56 IST2014-07-02T11:41:11+5:302014-07-02T11:56:09+5:30
भारताच्या सीमारेषा सुरक्षेला बळकट करण्यासाठी चीन सीमारेषेवर राहणा-या नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याची तयारी मोदी सरकारने सुरु केली आहे.

सीमारेषेवरील भारतीयांना लष्करी प्रशिक्षण
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यास प्राधान्य दिले असले तरी भारताच्या सीमारेषा सुरक्षेला बळकट करण्यासाठी चीन सीमारेषेवर राहणा-या नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याची तयारी मोदी सरकारने सुरु केली आहे.
गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार शेजारी राष्ट्रांशी मैत्री करतानाच सीमा रेषेवरील सुरक्षा व्यवस्था आणखी बळकट करण्यास प्राधान्य देणार आहे. यानुसार सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणा-या नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 'सीमा रेषेवरील नागरिक भारताचे कान व डोळे म्हणून काम करु शकतात. शेजारी राष्ट्राच्या हालचालींवर ते सरकारला महत्त्वपूर्ण माहिती पुरवू शकतात. यासाठीच त्यांना निमलष्करीदलाच्या धर्तीवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपातकालीन स्थितीत ते देशाच्या मदतीला धावू शकतील असा दावा एका अधिका-याने केला. अनेक देश सीमारेषेजवळील गावांमध्ये राहण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देतात. दुर्दैवाने भारतात संवेदनशीलतेच्या नावाखाली सीमारेषेवर स्थलांतरित होण्यास प्राधान्य दिले जात नाही. केंद्र सरकारला नेमका हाच बदल करायचा आहे असेही गृहमंत्रालयातील अधिका-याने स्पष्ट केले.सीमारेषेवरील भारतीयांना लष्करी प्रशिक्षण