Military Convoy Accident in Ladakh: लडाखमधील गलवान खोऱ्यात मोठी दुर्घटना घडली. खोऱ्यातील चारबाग भागात एक जीवघेणा अपघात झाला. लष्कराच्या वाहनावर एक मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. वाहनात प्रवास करणारे दोन अधिकारी शहीद झाले, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. जखमींना विमानाने रूग्णालयात हलवण्यात आले. लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग अशी शहीद जवानांनी नावे आहेत. तर जखमींमध्ये २ मेजर आणि १ कॅप्टन दर्जाचे अधिकारी आहे.
सैनिकांचा ताफा दुर्बुक ते चोंगटास येथे प्रशिक्षण सहलीवर होता. बुधवारी सकाळी ११:३०च्या सुमारास दुर्बुकहून चोंगताशला जाणारे लष्करी वाहन भूस्खलनात अडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये १४ सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग हे दोघे शहीद झाले. तर मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० आर्म्ड) जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत लष्कराचे निवेदन
जखमी सैनिकांना लेह येथील १५३ जीएच येथे नेण्यात आले आहे. या अपघाताबाबत, भारतीय लष्कराच्या अग्निशमन आणि फ्युरी कॉर्प्सने माहिती दिली आहे की, ३० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता लडाखमध्ये लष्करी ताफ्याच्या वाहनावर दगडावरून दगड पडला. बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांतील लष्करी वाहनांचा झालेला हा सर्वात मोठा अपघात आहे. या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. त्यावेळी लष्कराचा ट्रक २००-३०० मीटर खोल खड्ड्यात पडला. या अपघातात ३ सैनिक शहीद झाले. हा लष्करी ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता.