शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:05 IST

पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं वैमानिकाचे प्राण वाचले

जयपूर: हवाई दलाच्या मिग-27 विमान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कोसळलं. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. त्या दरम्यानच विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे. सुदैवानं वैमानिक सुरक्षित आहे. विमान कोसळत असताना वैमानिकानं पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. काही दिवसांपूर्वीच हवाई दलाचं मिराज 2000 विमान कोसळलं होतं. हवाई दलाचं मिग-27 हे लढाऊ विमान पोखरणमधल्या इटा गावात कोसळल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिकाऱ्यानं दिली. वैमानिकानं विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचल्याचं संरक्षण विभागाचे प्रवक्ते सोम्बित घोष यांनी सांगितलं. 'दैनंदिन प्रशिक्षण सुरू असताना आज संध्याकाळी जैसलमेरमध्ये मिग-27 विमान कोसळलं. वैमानिक सुरक्षित आहे. मात्र या दुर्घटनेची चौकशी करुन त्यामागील नेमक्या कारणाचा शोध घेतला जाईल,' असं घोष म्हणाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक किरन कांग यांनी दिली. दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि हवाई दलाचे संपर्कात होते. अपघातानंतर पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले, असंदेखील त्या म्हणाल्या. या महिन्याच्या सुरुवातीलाच मिराज 200 हे प्रशिक्षणासाठी विमान बंगळुरुत कोसळलं होतं. हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळाजवळ 1 फेब्रुवारीला मिराज 2000 विमानाला अपघात झाला. यामध्ये दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला होता. विमान कोसळत असताना दोन्ही वैमानिकांनी बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र मोठा भडका उडाल्यानं दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलRajasthanराजस्थानAccidentअपघात