६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:41 IST2025-07-22T14:30:46+5:302025-07-22T14:41:20+5:30

भारतीय हवाई दल सप्टेंबरमध्ये रशियन बनावटीचे मिग-२१ लढाऊ विमाने निवृत्त करणार आहे. भारतीय हवाई दलात सुमारे ६२ वर्षे सेवा दिल्यानंतर, मिग-२१ ला चंदीगड एअरबेसवर एका विशेष समारंभात निरोप देण्यात येईल.

MiG-21 fighter jet to bid farewell after 62 years of service; fought Pakistan in 1965 war | ६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली

६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली

भारतीय हवाई दल सप्टेंबरमध्ये रशियन बनावटीचे MIG-21 हे लढाऊ विमान निवृत्त करणार आहे. भारतीय हवाई दलात सुमारे ६२ वर्षे सेवा दिल्यानंतर, चंदीगड एअरबेसवर एका विशेष समारंभात MIG-21 ला निरोप देण्यात येणार आहे.

MIG-21 चा १९६३ मध्ये हवाई दलात समावेश केला होता. या विमानाने १९६५, १९७१, १९९९ आणि २०१९ च्या सर्व प्रमुख लष्करी कारवायांमध्ये भाग घेतला आहे.

उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण

MIG-21 हे एक हलके सिंगल पायलट लढाऊ विमान आहे. भारतीय हवाई दलाने १९६० मध्ये पहिल्यांदा मिग-२१ विमान आपल्या ताफ्यात समावेश केला. सोव्हिएत रशियाच्या मिकोयान-गुरेविच डिझाइन ब्युरोने १९५९ मध्ये ते बांधण्यास सुरुवात केली. हे विमान १८ हजार मीटर उंचीवर उडू शकते. ते हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे.

त्याचे कमाल वेग ताशी २,२३० किलोमीटर म्हणजेच १,२०४ नॉट्स पर्यंत असू शकतो. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धांमध्ये मिग-२१ विमानांचा वापर करण्यात आला होता. १९७१ मध्ये, भारतीय मिगने चेंगडू एफ विमान पाडले .

या विमानाला'फ्लाइंग कॉफिन' असं म्हटलं जायचं

हे विमान रशियाने बनवले होते पण त्यात अनेक त्रुटी असल्याने ते क्रॅश होत असल्याचा दावा करण्यात आला होता. हे विमान रशियाने १९८५ मध्ये निवृत्त केले होते. अफगाणिस्तान आणि बांगलादेशनेही हे विमान निवृत्त केले आहे. त्याच्या खराब रेकॉर्डमुळे, या विमानाला अनेक टोपणनावे देण्यात आली आहेत, त्याला 'विडो मेकर', 'फ्लाइंग कॉफिन' असे म्हणत होते.

Web Title: MiG-21 fighter jet to bid farewell after 62 years of service; fought Pakistan in 1965 war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.