शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:56 IST

चहाची टपरी असलेल्या बच्चू चौधरी यांनी आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार वर्षांपासून १० रुपयांची नाणी जमा केली.

पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील चंद्रकोणा परिसरातून एक हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे, जी सोशल मीडियावर लाखो लोकांच्या मनाला भिडली आहे. मौला गावातील चहाची टपरी असलेल्या बच्चू चौधरी यांनी आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार वर्षांपासून १० रुपयांची नाणी जमा केली. शनिवारी, जेव्हा ते स्कूटी खरेदी करण्यासाठी नाण्यांनी भरलेला ड्रम घेऊन शोरूममध्ये पोहोचले तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले.

रिपोर्टनुसार, बच्चू चौधरी यांच्या मुलीने काही वर्षांपूर्वी स्कूटी खरेदी करण्याचा हट्ट केला होता. आर्थिक अडचणींमुळे ते तेव्हा आपल्या मुलीची इच्छा लगेच पूर्ण करू शकले नाहीत. परंतु त्यांनी एक दिवस त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा निर्धार केला होता. त्यांनी त्यांच्या चहाच्या टपरीवर एक रिकामा ड्रम ठेवला आणि दररोज त्यात १० रुपयांची नाणी टाकू लागले.

शोरूममध्ये आणला नाण्यांनी भरलेला ड्रम

चार वर्षांच्या प्रयत्नांचे फळ मिळालं. शनिवारी बच्चू चौधरी चंद्रकोणा टाउनमधील गोसाई बाजार येथील शोरूममध्ये पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं की, त्याला स्कूटी खरेदी करायची आहे. शोरूमचे कर्मचारी अरिंदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा बच्चू यांनी ड्रम आणला तेव्हा आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. ड्रम इतका जड होता की तो उघडण्यासाठी आणि जमिनीवर पसरलेली नाणी मोजण्यासाठी आठ लोक कामाला लागले."

पैसे मोजायला लागले २ तास २५ मिनिटं

"मोजणीत असं समोर आलं की ड्रममध्ये अंदाजे ६९,००० रुपयांची नाणी होती आणि उर्वरित नोटा होता. एकूण ११०,००० रुपये होते." दोन तास आणि २५ मिनिटं पैशांची मोजणी केल्यानंतर, बच्चू चौधरी यांनी अखेर त्यांच्या मुलीचं स्वप्न पूर्ण केलं आणि स्कूटी खरेदी केली. "मी श्रीमंत नाही, पण मला माझ्या मुलीचं स्वप्न अपूर्ण राहू द्यायचं नव्हतं. चार वर्षांच्या कष्टाचं फळ मिळालं" असं बच्चू चौधरी यांनी म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tea seller fulfills daughter's scooter dream, saving coins for years.

Web Summary : A tea seller in West Bengal saved 10-rupee coins for four years to buy his daughter a scooter. He took a drum filled with ₹69,000 in coins to a showroom and, along with notes, purchased the scooter for ₹110,000, fulfilling her dream.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलwest bengalपश्चिम बंगाल