शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

Microsoft Windows Outage मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड, जगभरात बँकांपासून विमानसेवेपर्यंत अनेक सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:05 IST

Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे.

Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. जगभरामध्ये विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रिनचा एरर दिसत आहे. दरम्यान, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बहुतांश विंडोड युझर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसत आहे. ही अडचण हल्लीच्या क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे. या अडचणीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत.  

दरम्यान, या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. मुंबई विमानतळ आणि गोवा विमातळावर सर्व्ह ठप्प झाल्याची बातमी आली आहे. तसेच मुंबई विमानतळावर चेक इन सिस्टिम ठप्प झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आकासा एअरने सेवा ठप्प झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पाइसजेड आणि इंडिगेकडूनही अशी तांत्रिक अडचण येत असल्याचे म्हटले आहे. सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म क्राऊडस्ट्राइकमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे सेवा बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बहुतांश युझर्स याबाबत तक्रार करत आहेत. या अडचणीमुळे लाखो युझर्सना फटका बसला आहे. अनेक युझर्स त्यांच्याकडे सिस्टिम शटडाऊन झाल्याची किंवा त्यांना ब्लू स्क्रीनची अडचण येत असल्याची तक्रार करत आहे. याचा फटका मुख्य बँका, इंटरनॅशनल एअरलाइन्स, जीमेल, अॅमेझॉन आणि इतर अत्यावश्यक सेवांना फटका बसला आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्येही बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आऊटलेट आणि एअरलाइन्सची सेवा प्रभावित झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर यांनी सांगितले की, देशात शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणावार कंपन्यांच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत. 

 

 

टॅग्स :microsoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयBanking Sectorबँकिंग क्षेत्रairplaneविमानtechnologyतंत्रज्ञान