शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 19:52 IST

MHA Ban On HUTI: संघटनेला बेकायदेशीर घोषित करताना गृह मंत्रालयाने हिज्ब-उत-तहरीर भारताच्या लोकशाहीसाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.

MHA Ban On Hizb-Ut-Tahrir Islamic:दहशतवादाविरोधात केंद्र सरकारची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने गुरुवारी (10 ऑक्टोबर) जागतिक पॅन इस्लामिक फुटीरवादी संघटना "हिज्ब-उत-तहरीर"(Hizb-Ut-Tahrir)वर बंदी घातली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिहादद्वारे लोकशाही सरकार उलथून टाकून भारतासह जागतिक स्तरावर इस्लामिक राज्य आणि खिलाफत स्थापन करणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.

गृह मंत्रालयाने या संघटनेला भारताच्या लोकशाही प्रणाली आणि अंतर्गत सुरक्षेसाठी "गंभीर धोका" म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेवर बंदी घालताना सांगितले की, ही संघटना एक जागतिक पॅन-इस्लामिक कट्टरतावादी संघटना आहे, ज्याची स्थापना 1953 मध्ये जेरुसलेममध्ये झाली होती. या संघटनेला आता सरकारनी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले आहे.

संघटना ISIS साठी काम करतेकेंद्रीय गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले की, निष्पाप तरुणांना इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करण्यात आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यात हिज्ब-उत-तहरीरचा प्रमुख सहभाग आहे. ही संघटना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ॲप्सद्वारे भोळ्या भाबड्या तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करते. 

भारतातील कारवायांमध्ये सामील केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की, हिज्ब-उत-तहरीर संघटनेचा भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये भाग आहे. त्यामुळे सरकारने या संघटनेला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 अंतर्गत प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले आहे.

संघटनेच्या अनेकांना अटक यापूर्वी, तामिळनाडूतून संघटनेशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या संघटनेच्या 'नकीब' आणि 'आमिर' फैजुल रहमानला अटक केली. आरोपींनी हिज्ब-उत-तहरीरची विचारधारा विविध गटांमध्ये पसरवण्यासाठी अनेक गुप्त बैठका घेतल्या आणि तमिळनाडूमध्ये फुटीरतावादी मोहिमा केल्याचा आरोप आहे.

 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद