अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:34 IST2025-11-08T17:32:40+5:302025-11-08T17:34:24+5:30
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील ९० अंशाच्या पुलाच्या वादानंतर, आता मेट्रो स्टेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक मेट्रो स्टेशन बांधण्यात आले होते, परंतु नंतर त्याची उंची कमी असल्याचे कळाले. यामुळे स्टेशनखालून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत होता.

अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
मागील काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशातील एका ९० अंशाच्या पुलाचा फोटो व्हायरल झाला होता. अनेकांनी या पुलाची थट्टा उडवली होती, आता मध्य प्रदेशातून आणखी एका बांधकामाची थट्टा उडवली जात आहे. मेट्रो स्टेशनचे बांधकाम जवळजवळ दोन वर्षे सुरू होते, वाहतूक वळवण्यात आली. स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर, स्टेशन रस्त्यापासून उंची कमी असल्याचे आढळून आले.
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
काही दिवसांपासून, केंद्रीय विद्यालय मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या खांबांच्या वरच्या भागावर जास्त उंचीची वाहने आदळत आहेत, यामुळे खांबांचे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी सिमेंट कोसळून खाली पडले आहे. यानंतर, रस्त्याची आणि मेट्रो स्टेशनची उंची मोजण्यात आली आणि ती कमी असल्याचे दिसून आले. यानंतर अधिकाऱ्यांना धक्का बसला.
रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर उंची कमी असल्याचे समोर आले
आता, दोन वर्षे बांधकाम चालुनही मेट्रो स्टेशनची उंची वाढवता आलेली नाही, म्हणून एजन्सींनी खालून जाणारा रस्ता खोदण्याचा प्रयत्न केला, हा रस्ता काही दिवसापूर्वीच केला होता. नियमांनुसार, कोणतेही मेट्रो स्टेशन रस्त्यापासून किमान ५.५ मीटर (१८ फूट) वर असले पाहिजे. या मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि स्टेशन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, तेव्हा उंच ट्रक मेट्रो स्टेशनवर आदळू लागले, यामुळे संपूर्ण स्टेशनला धोका निर्माण झाला. यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले.
म्हणून आता मेट्रो कंत्राटदाराने रस्ता आणि मेट्रो स्टेशनमधील अंतर वाढवण्यासाठी रस्ता खोदला आहे, यामुळे जड वाहने स्टेशनला घासणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या रस्त्याचा दुसरा लेन मेट्रो स्टेशनच्या खाली आहे आणि या बाजूचा लेन शेजारच्या लेनपेक्षा सुमारे दोन फूट उंच आहे. म्हणूनच या लेनवरून जाणारी जड वाहने मेट्रो स्टेशनवर आदळत होती.