शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
3
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
4
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
5
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
6
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
7
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
8
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
9
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
10
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
11
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
12
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
13
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
14
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
15
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
16
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
17
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
18
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
19
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
20
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत मेट्रो सेवा संपूर्ण बंद; लॉकडाऊनही वाढविला, उत्तर प्रदेशमध्येही १७ मेपर्यंत कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:10 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, लॉकडाऊनमुळे दिल्लीतील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. २६ एप्रिलपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आमच्या सरकारने दिल्लीतील वैद्यकीय सुविधांत सुधारणा करण्यासाठी पावले उचलली.

विकास झाडे -नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे दिल्लीमध्ये १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला असून मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्येही कडक निर्बंधांची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्लीत अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीला ऑक्सिजन मिळायला लागले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.  दिल्लीत औषधांच्या काळ्याबाजारालादेखील ऊत आला आहे. चढ्या किमतीत वैद्यकीय उपकरणे आणि सेवा मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, लॉकडाऊनमुळे दिल्लीतील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. २६ एप्रिलपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आमच्या सरकारने दिल्लीतील वैद्यकीय सुविधांत सुधारणा करण्यासाठी पावले उचलली. रुग्णशय्यांची संख्या वाढविली. ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न दिल्ली सरकार केंद्राच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीत औषधांची टंचाई जाणवत असून ती दूर करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन हा कडक स्वरूपाचा असून दिल्लीतील मेट्रो सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे आणखी १७,३६४ नवे रुग्ण आढळून आले, तसेच आणखी ३३२ जणांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMetroमेट्रोdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश