मेट्रोच्या बातमीला चौकट
By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:15+5:302015-09-10T16:46:15+5:30

मेट्रोच्या बातमीला चौकट
>चौकटमुंबई मेट्रोसारखी गत होऊ नयेमुंबईमध्ये रिलायन्स कंपनीने उभारलेल्या मेट्रोचा तिकिट दर ११० रूपयांपर्यंत वाढले आहेत. डीएमआरसीने केंद्राकडे अहवाल सादर केला होता, त्यावेळी स्वारगेट ते पिंपरी या मार्गासाठी केवळ १७ रूपये तिकिट दर असेल असे नमूद केले होते. मात्र आता प्रकल्पाच्या खर्चात हजार कोटींनी होत असलेली वाढ पाहता तिकिटाचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात दुचाकी वाहनांचा वापर मोठया प्रमाणात होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची योजना आणली आहे, मात्र ही मेट्रो जर परवडणारी नसेल तर त्याचा वापर मर्यादितच होऊ शकेल. त्यामुहे परवडणारी मेट्रो बनविण्याचे आव्हान मेट्रो कंपनीला पेलवावे लागेल.