शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित रेल्वे व्यवस्था गरजेची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 20:32 IST

भारतीय रेल्वे सेवेवर 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांचं परखड भाष्य

नवी दिल्ली: बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी आहे. देशातील सर्वसामान्य माणसाला सुरक्षित रेल्वे व्यवस्था पुरवणं गरजेचं आहे, असं मत 'मेट्रो मॅन' म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित असणाऱ्या ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं. बुलेट ट्रेन अतिशय महाग असल्यानं ती सामान्य माणसाला परवडणारी नाही, असं 86 वर्षांच्या श्रीधरन यांनी म्हटलं. देशाला आता बुलेट ट्रेनची नव्हे, तर स्वच्छ, सुरक्षित आणि वेगवान रेल्वे व्यवस्थेची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांनी देशातील रेल्वे सेवेबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं. भारतीय रेल्वेत झालेल्या बदलांबद्दल प्रश्न विचारल्यावर श्रीधरन यांनी त्यांचे परखड विचार मांडले. 'रेल्वेतील बायो टॉयलेट्सचा विचार केल्यास त्यामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा व्हायच्या आहेत. रेल्वे गाड्यांचा वेग वाढलेला नाही. उलट प्रमुख गाड्यांचा वेग कमी झाला आहे. रेल्वे गाड्या वेळेवर येणं, त्या वेळापत्रकानुसार धावणं, हे आजही आपल्यासाठी मोठं आव्हान आहे. रेल्वे अपघातांची संख्या कमी झालेली नाही. लेव्हल क्रॉसिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,' असं म्हणत श्रीधरन यांनी रेल्वे विभागाच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला. विकसित देशांमधील रेल्वे सेवांचा विचार केल्यास भारतीय रेल्वे तब्बल 20 वर्ष मागे असल्याचं श्रीधरन म्हणाले. 'देशाच्या विकासाच्या वेगाबद्दल मी अतिशय उत्सुक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांचा कालावधी लोटला. तरीही देशाची एक तृतीयांश लोकसंख्या अद्यापही दारिद्र्य रेषेखाली आहे. राजकीय नेत्यांना स्वत:चं राजकीय लक्ष्य गाठण्यात जास्त स्वारस्य आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMetroमेट्रोrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी