केरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार, पण...; मेट्रो मॅन श्रीधरन यांनी सांगितली 'मन की बात'

By देवेश फडके | Published: February 19, 2021 05:28 PM2021-02-19T17:28:27+5:302021-02-19T17:31:08+5:30

मेट्रो मॅन म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन (E Sreedharan) आता आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. ८८ वर्षीय श्रीधरन २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असून, पक्षाने परवानगी दिल्यास केरळची विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे श्रीधरन यांनी यावेळी सांगितले.

metro man e sreedharan to fight assembly elections and ready for kerala chief ministership | केरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार, पण...; मेट्रो मॅन श्रीधरन यांनी सांगितली 'मन की बात'

केरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार, पण...; मेट्रो मॅन श्रीधरन यांनी सांगितली 'मन की बात'

Next
ठळक मुद्देकेरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार - श्रीधरनराज्यपाल बनण्यासाठी तयार नाही - श्रीधरनपक्षाने परवानगी दिल्यास निवडणूक लढवणार - श्रीधरन

नवी दिल्ली : मेट्रो मॅन म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन (E Sreedharan) आता आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. ८८ वर्षीय श्रीधरन २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असून, पक्षाने परवानगी दिल्यास केरळची विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे श्रीधरन यांनी यावेळी सांगितले. (metro man e sreedharan to fight assembly elections and ready for kerala chief ministership)

पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळाल्यास केरळ विधानसभा निवडणुका लढण्यास माझी तयारी आहे. पक्षासाठी योगदान देण्याचे माझे लक्ष्य राहील. भाजपला केरळमध्ये विजयी करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन, असे श्रीधरन यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दहशत, हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग: पंतप्रधान मोदी

केरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार

ई. श्रीधरन म्हणाले की, भाजपला केरळमध्ये अधिकाधिक संख्येने निवडून आणण्याचा माझा प्रयत्न असेल. भाजपला केरळमध्ये चांगले यश मिळाले, तर मुख्यमंत्री पद स्वीकारण्यासही तयार आहे. मात्र, केरळमध्ये जास्तीत जास्त पायाभूत सुविधा देण्यावर भर राहील. तीन ते चार क्षेत्रामध्ये काम होणे अधिक गरजेचे आहे. पायाभूत सुविधा निर्माण करत असताना राज्यावरील कर्ज कसे कमी करता येईल, यावरही भर देण्याचा प्रयत्न करेन, असे श्रीधरन यांनी स्पष्ट केले. 

राज्यपाल बनण्यासाठी तयार नाही

पक्षाकडून सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पडण्यास नेहमी सज्ज असेन. मात्र, एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. राज्यपालांचे पद पूर्णपणे घटनात्मक आहे. राज्यपालांना फारसे अधिकार नसतात. राज्यपाल बनल्यानंतर राज्यासाठी अपेक्षित योगदान देऊ शकणार नाही, असे श्रीधरन यांनी सांगितले. 

दरम्यान, 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीधरन देशातील प्रसिद्ध तंत्रज्ञ आहेत. देशातील तसेच परदेशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांना ओळखले जाते. ई. श्रीधरन येत्या रविवारी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच भाजपचे केरळ अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केले होते. भाजपकडून दोन आठवडे चालणाऱ्या 'विजय यात्रे'चे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. 

Web Title: metro man e sreedharan to fight assembly elections and ready for kerala chief ministership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.