कोलकात्यात मेट्रो दोन तास खोळंबली

By Admin | Updated: June 24, 2014 02:10 IST2014-06-24T02:10:55+5:302014-06-24T02:10:55+5:30

येथील पार्क स्ट्रीट स्थानकावरून निघाल्यानंतर काही वेळातच दक्षिण कोलकात्याकडे निघालेल्या बिगर वातानुकूलित मेट्रोतील प्रवाशांना सोमवारी विचित्र स्थितीचा सामना करावा लागला़

Metro expands in Kolkata for two hours | कोलकात्यात मेट्रो दोन तास खोळंबली

कोलकात्यात मेट्रो दोन तास खोळंबली

>कोलकाता : येथील पार्क स्ट्रीट स्थानकावरून निघाल्यानंतर काही वेळातच दक्षिण कोलकात्याकडे निघालेल्या बिगर वातानुकूलित मेट्रोतील प्रवाशांना सोमवारी विचित्र स्थितीचा सामना करावा लागला़ सकाळी 11़25 च्या सुमारास मेट्रोने स्थानक सोडले व ती एका बोगद्यातून वाट काढत निघाली़, पण बोगद्यात जाताच तिच्यात तांत्रिक बिघाड उद्भवला व मेट्रो जागेवर थांबली़ काही क्षणात मेट्रोतील दिवे, पंखे सर्व काही बंद झाल़े काही कळण्याच्या आतच  मेट्रोतील प्रवाशांना दोन तास ताटकळत रहावे लागले. 
नायडू यांनी केला मेट्रोतून प्रवास
नायडू यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिस:या टर्मिनलपासून शिवाजी पार्क स्टेशनर्पयत मेट्रोतून 15 मिनिटांचा प्रवास केला़ या प्रवासात नायडूंनी प्रवाशांशी चर्चा केली़ भाडेकपात, स्थानकांवरील सुविधा आणि मेट्रोच्या फे:या वाढविण्याचे अनेक सल्ले प्रवाशांनी त्यांना दिल़े यानंतर पत्रकारांशी बोलताना, प्रवाशांनी दिलेल्या सूचनांवर गंभीरपणो विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 

Web Title: Metro expands in Kolkata for two hours