शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

MeToo: आता वेळ 'ती'च्या संघर्षाला पाठबळ देण्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:53 PM

लोकमत वुमेन समीट: #MeToo नव्हे, तर #WeToo चळवळ

पुणे : मातृसत्ताक पद्धतीपासून पितृसत्ताक पद्धतीकडे कधी ओढले गेलो आणि त्याचा व्यापक परिणाम आपल्यावर झाला हे कळलेच नाही. अगोदरच्या संस्कृतीतील प्रश्न पुन्हा एकदा नव्याने दुसऱ्या परंपरेच्या माध्यमातून पुढे आले. यासगळ्यात फरफट मात्र ‘ती’च्या अस्तित्वाची झाली. अथक संघर्ष, परंपरेच्या जोखडातून मुक्त होऊन नव्या विचारांच्या दिशेने स्वत:ची पायवाट तयार करणाºया तिच्या संघर्षाला पाठबळ देण्याचे काम लोकमतच्या वुमेन समीटमधून केले.एनईसीसी आणि युनिसेफच्या सहयोगाने आयोजित लोकमत वुमेन समीटचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या सोहळ्याला मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन राझानद्रोस, यूएसके फाऊंडेशनच्या संस्थापक उषा काकडे, मुकुल माधव फाऊंडेशनच्या विश्वस्त रितू छाब्रिया, अभिनेत्री दिव्या सेठ, राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा, युनिसेफच्या जेंडर स्पेशालिस्ट अंतरा गांगुली, लोकमतच्या संपादकीय विभागाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी तेजस्विनी साठे आणि त्यांच्या चमूने शक्तीवंदना सादर केली.स्त्रीला सक्षम व ठामपणे उभे राहण्यासाठी तिला पुरुषीपणाचे आव्हान मोडून काढावे लागेल, असा सूर ‘‘ओव्हरकमिंग द आॅडस - बिगिनिंग आॅफ अ न्यू टूमारो’’ या परिसंवादात उमटला. या परिषदेचे बायो आयुर्वेदिक हे वेलनेस पार्टनर, ढोले-पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग हॉस्पिटॅलिटी पार्टनर, पुला हे कम्युनिटी पार्टनर आणि फिकीफ्लो हे फॉर्म पार्टनर आहेत.महिलांचे प्रश्न, समस्या आणि त्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकमतच्या वतीने दरवर्षी पुण्यात लोकमत वुमेन समीटचे आयोजन केले जाते. महिलांनी सर्व क्षेत्रांत प्रगती केली, परंतु त्या स्वतंत्र झाल्यात का? महिलांच्या सुरक्षेपासून हुंड्यापर्यंत आणि लैंगिक शोषण, छेडछाडीपासून अत्याचारापर्यंत अनेक विषयांत हे स्वातंत्र्य जखडले गेले आहे का? त्यातून बाहेर पडण्याची उपाययोजना काय? या वुमेन समीटमध्ये समाजाच्या सर्व क्षेत्रांतून मान्यवर महिला उपस्थित आहेत. येथील चर्चेतून काहीतरी ठोस निघावे, की जे समाजापुढे आणि शासनापुढे आपण मांडू शकतो. लोकमतने महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती या उपक्रमाची सुरुवातही ‘लोकमत’ने पुण्यातूनच केली आहे.- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्डआफ्रिकेतदेखील सर्व काही आलबेल आहे, असे नाही. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे असून परंतु त्याच क्षेत्रापासून त्यांना वंचित ठेवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. स्त्रियांना केवळ चूल आणि मूल अशा संसाराच्या रहाटगाडग्यात अडकवून पुरुषी मानसिकता त्यांच्यावर प्रभाव टाकते. जोपर्यंत सामाजिक उतरंडीमधील भेदभाव संपत नाही तोपर्यंत विकासाचा मार्ग खडतर आहे.- मेरी लिओन्टाइन राझानद्रोसस्त्री आणि पुरुष समानतेविषयी बोलायचे झाल्यास सुरुवातीला उल्लेख सार्वजनिक स्वच्छतागृहांचा करावा लागेल. शहरात पुरुषांकरिता ती मोठ्या संख्येने आहेत. स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे शोधावी लागतात, हे दुर्दैव. आजही देशात शिक्षण, कुटुंब, आरोग्य, रोजगार यांसारख्या क्षेत्रांमध्ये समानतेची गरज आहे. परंतु या सगळ्यांची सुरुवात शिक्षणापासून करावी लागेल. तसे झाल्यास बरेचसे प्रश्न सुटण्यास मदत होईल. अद्याप स्त्री-पुरुषभेद, स्त्रियांकडे सामाजिक दृष्टीने पाहण्याची सवय नागरिकांना लावावी लागणार आहे. - रितू छाब्रियागरिबी आणि निरक्षरता हे समाजाला लागलेले ग्रहण म्हणावे लागेल. आजही देशातील वेगवेगळ्या भागात शिक्षणाची बीजे पुरेशा गांभीर्याने रुजलेली नसल्याचे दिसते. यामुळे मात्र खेड्यातील गोरगरीब मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, की सुरुवातीपासून लहान मुलांच्या शिक्षण या घटकावर लक्ष केंद्रित केले. बिहारमधील एका गावात दारूच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या लोकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी नव्हती. पीडितांसाठी काही करू पाहणाºयांच्या पाठीशी उभे राहण्याची आज गरज आहे. - सुधा वर्गीसस्त्रियांना सक्षम करायचे असल्यास त्यांचे मानसिक मनोबल वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्याखेरीज स्त्री सक्षमीकरण होणार नाही. त्याला समाजातील सर्व घटकांची जोड द्यावी लागेल. रेखा शर्मा यांनी महिलांमधील परिवर्तनाकरिता आता राजकीय धोरणे बदलावी लागतील. कायद्यामध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांचा विचार करण्यात आला आहे. आपण लहानपणापासून मुलींना लग्नाची स्वप्ने दाखवून त्यांना स्वप्नाळू बनवत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.- उषा काकडे, अध्यक्ष, यूएसके फाऊंडेशनस्वीडन आणि स्टॉकहोममध्येदेखील पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाणी वाचविण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त पुढाकार घेत असतात जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरीदेखील स्त्री-पुरुष यांच्यासंबंधीचे प्रश्न सारखेच आहेत. मात्र भौगोलिक क्षेत्र, तेथील सामाजिक, राजकीय परिस्थिती यांचा परिणाम समाजातील ‘‘पुरुषी वर्चस्ववादा’’वर होत आहे. - रुपाली देशमुख

टॅग्स :Metoo CampaignमीटूLokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८