शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:42 IST

लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सॉल्ट लेक येथील स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली. दुसरीकडे भाजपाने या घटनेमुळे 'बंगाल आणि फुटबॉल' या दोघांचाही अपमान झाल्याचं म्हणत तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मेस्सी १० मिनिटांतच गेल्याने महागडी तिकिटं विकत घेऊन स्टेडियममध्ये आलेल्या हजारो फुटबॉलप्रेमींना यामुळे मोठा धक्का बसला. संतप्त फॅन्सनी गोंधळ घातला. त्यानंतर बाटल्या फेकल्या, होर्डिंग्स फाडले, खुर्च्या तोडल्या. यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत त्या 'मगरीचे अश्रू' ढाळत आहेत, असं म्हटलं.

मालवीय यांनी आरोप केला की, 'ही मिसमॅनेजमेंट आणि भ्रष्टाचार तृणमूल सरकारच्या कार्यशैलीचा भाग बनला आहे.' मालवीय म्हणाले की, 'या घटनेने बंगालच्या लोकांच्या भावनांचा आणि फुटबॉलप्रेमींचा अपमान केला आहे.' त्यांनी राज्याचे क्रीडामंत्री अरूप बिस्वास आणि मंत्री सुजित बोस यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची, त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची आणि प्रेक्षकांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत करण्याची मागणी केली.

 Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले

"मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांनीही सरकारला धारेवर धरत प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून या अव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बंगालची प्रतिमा मलीन झाली आहे, असं म्हटलं. तृणमूल काँग्रेसने मात्र या आयोजनापासून स्वतःला वेगळं ठेवत हा कार्यक्रम एका खासगी एजन्सीने आयोजित केला होता, असं सांगितलं.

Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड

टीएमसीचे प्रवक्ते तौसीफ रहमान यांनी या कार्यक्रमात पक्षाची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला. पक्षाचे नेते कुणाल घोष यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं आणि राज्य सरकारने मेस्सीची माफी मागितली असून चौकशी समिती नेमली आहे, असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी घोषणाबाजी, तोडफोड आणि झेंड्यांबद्दल प्रश्न उपस्थित करत कटाची शक्यताही व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Messi Event Chaos: Political Blame Game Erupts in West Bengal

Web Summary : A chaotic Messi event in Kolkata sparked political clashes. BJP criticized TMC after fans rioted over Messi's brief appearance. Mamata Banerjee apologized, while accusations of mismanagement and conspiracy arose. An investigation is underway.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसLionel Messiलिओनेल मेस्सीPoliticsराजकारण