अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 06:31 IST2025-12-17T06:31:34+5:302025-12-17T06:31:58+5:30
जागतिक फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी यांनी अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या वनतारा या वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धना केंद्राला विशेष भेट दिली.

अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
जामनगर : जागतिक फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी यांनी अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या वनतारा या वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धना केंद्राला विशेष भेट दिली. निसर्गपूजा आणि सर्व सजीवांप्रती आदर राखत वनतारातीला उपक्रमांची सुरुवात होते. मेस्सींच्या भेटीतही हा सांस्कृतिक वारसा ठळकपणे दिसून आला. त्यांनी पारंपरिक विधींमध्ये सहभाग घेतला, वन्यजीवांचे निरीक्षण केले आणि तज्ज्ञांशी संवाद साधला.
इंटर मियामी संघातील सहकारी लुईसा सुवारेझ आणि रोड्रिगो डी पॉल यांच्यासह मेस्सींचे स्वागत पारंपरिक लोकसंगीत, शुभेच्छा व शुद्धतेचे प्रतीक असलेल्या फुलांच्या वर्षावाने आणि विधिवत आरतीने करण्यात आले. मंदिरात महाआरतीसह अंबे मातेची पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा आणि शिवाभिषेकात त्यांनी सहभाग घेतला.
यानंतर मेस्सी व इतरांनी वनताराचा दौरा केला. त्यांनी हरित ऊर्जा संकुल आणि जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी संकुलालाही भेट दिली आणि या प्रकल्पांच्या व्याप्ती व दूरदृष्टीबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
सिंह, बिबटे, वाघ आणि अन्या संकटग्रस्त प्राण्यांच्या काळजी केंद्रात मेस्सीनी नैसर्गिक वातावरणासारख्या समृद्ध इकोसिस्टिममध्ये वाढणाऱ्या प्राण्यांसोबत वेळ घालवला. अनेक प्राणी त्यांच्या जवळ आले. विशेष पशुवैद्यकीय उपचार, आहार वर्तन प्रशिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या घेतली जाणारी निगा यांमुळे प्राणी कसे आनंदी आहेत, याचे त्यांनी निरीक्षण केले.
त्यांनी वन्यजीव रुग्णालयालाही भेट देऊन प्रत्यक्ष उपचार व शस्त्रक्रिया पाहिल्या नंतर ओकापी, गेंडे, जिराफ आणि हत्ती यांना खाद्य दिले. जागतिक दृष्टीकोनातून भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी पंतप्रधाना मोदी यांच्या बांधिलकीचेही त्यांनी कौतुक केले. मेस्सीनी मणिकलाल या वाचवलेल्या हत्तीच्या पिल्लाची भेट घेतली. मणिकलालसोबत मेस्सी फुटबॉल खेळला.
वनतारातील छाव्याचे नाव ठेवले लिओनेल
अनाथ आणि असुरक्षित पिल्लांसाठी असलेल्या फॉस्टर केअर सेंटरमध्ये मेस्सींनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल जाणून घेतले. याच ठिकाणी अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी आशा आणि सातत्याचे प्रतीक म्हणून, फुटबॉल दिग्गजाच्या सन्मानार्थ एका सिंहाच्या छाव्याचे 'लिओनेल' असे नामकरण केले.
"वानतारा जे करते ते खरोखरच सुंदर आहे. प्राण्यांसाठीचे कार्य, त्यांची काळजी, त्यांना वाचवण्याची आणि सांभाळण्याची पद्धत अत्यंत प्रभावी आहे. आम्हाला येथे अतिशय आनंद मिळाला. हा अनुभव मनात राहणारा आहे. या अर्थपूर्ण कार्याला प्रेरणा आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुन्हा नक्कीच भेट देऊ."
- लिओनेल मेस्सी, दिग्गज फुटबॉलपटू
जिव्हाळ्याचे नाते
या भेटीतून मेस्सीची नम्रता, मानवतावादी दृष्टिकोन आणि अनंत अंबानी यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले. अनंत अंबानी यांनी वनताराला भेट देऊन प्राणी आणि मानवतेसाठी प्रेरणा दिल्याबद्दल लिओनेल मेस्सीनी आभार मानले.