शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

आठ दिवसांपासून सुरू असलेला माल वाहतूकदारांचा संप अखेर मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 8:32 PM

माल वाहतूकदारांनी गेल्या काही दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. 

नवी दिल्ली- माल वाहतूकदारांनी गेल्या काही दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.  माल वाहतूकदारांच्या शिखर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. थोड्याच वेळात दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन वाहतूकदार संप मागे घेण्याची घोषणा करतील. तब्बल आठ दिवसांनी देशभरातील माल वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इंधनाचे दर कमी करून देशभरातील डिझेल दर समान करावेत, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांची सक्ती करू नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. माल वाहतूकदार शिष्टमंडळाची अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बुधवारी भेट झाली होती.त्याच वेळी गोयल यांनी माल वाहतूकदार आणि सरकारी प्रतिनिधींची समिती नेमून मागण्यांवर निर्णय घेईल, असा प्रस्ताव मांडला. परंतु माल वाहतूकदारांना तो प्रस्ताव मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर आज पुन्हा पीयूष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Strikeसंप