शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:25 IST

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

नवी दिल्ली : देशातील शालेय विद्यार्थ्यांपैकी ८१ टक्के विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, निकाल यामुळे मानसिक तणावाखाली असतात. हा त्रास माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना जास्त जाणवतो. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला.

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

ऑनलाइन पद्धतीने जे शिकविले जाते ते ५१ टक्के विद्यार्थ्यांना नीट उमजत नाही. शिक्षकांनी शिकविलेला धडा समजून घेण्यात त्यांना काही अडचणी येतात. 

३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आलेल्या या पाहणीत ३.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. असे एनसीईआरटीने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे. 

शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षितकेंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यातील तरतुदींनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम रितीने कसे शिकवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा बारकाईने वाचावा व त्यातील गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. 

सर्वेक्षण का केले?केंद्र सरकारने शिक्षक पर्व दरम्यान घेतलेल्या अनेक उपक्रमांसह हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. कोरोना महामारीनंतर देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने केलेले हे पहिले सर्वेक्षण आहे. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक पर्व साजरे केले जात आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा