शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

हॅप्पीनेस क्लास : शाळेत रमल्या मेलानिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 2:17 AM

मेलानिया यांना विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांचा हार घातला, तसेच त्यांना टिळा लावून त्यांचे औक्षण केले. ​​​​​​​

नवी दिल्ली : नानकपुरा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेला मेलानिया यांनी भेट दिली. पूर्णत: विविध रंगांनी, फुलांनी नटलेल्या या शाळेत मेलानिया यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. मेलानिया यांना विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांचा हार घातला, तसेच त्यांना टिळा लावून त्यांचे औक्षण केले.शाळेच्या आवारातील विविध वाद्यांनी वातावरणात प्रसन्नता आणली. राजस्थानी फेटा घातलेले विद्यार्थी व निळ्या रंगाचा घागरा घातलेल्या विद्यार्थिनीने मेलानिया यांचे स्वागत केले. गुलाबी रंगाचा घागरा घातलेल्या विद्यार्थिनीशी मेलानिया यांनी संवाद साधला. त्यानंतर हॅप्पीनेस क्लासमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वर्गात मेलानिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांशी गप्पा मारतानाच मेलानिया त्यांच्यासोबत खेळही खेळल्या. शैक्षणिक मजकुरांनी वर्गाच्या भिंती सजल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शाळेच्या वतीने त्यांना एक चित्र भेट देण्यात आले.या भेटीवेळी शाळेला सुरक्षा यंत्रणांनी घेरले होते. विद्यार्थी गणवेशात होते. यावेळी मेलानिया म्हणाल्या की, माझा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारतीय लोक अतिशय चांगले व सहृदयी आहेत. मी व राष्ट्राध्यक्ष येथे अतिशय आनंदी आहोत. सर्वोदयचा अर्थ आहे की सर्वांसाठी उन्नती, समृद्धी. येथील शिक्षकांचे परिश्रम व विद्यार्थ्यांचा उत्साह सारे काही सांगतो आहे. ही खूपच चांगली शाळा आहे. अशा संकल्पना व उपक्रम जगाला प्रेरणा देऊ शकतात. माझे अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल आभार.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी टष्ट्वीट केले की, मेलानिया आज आमच्या स्कूलमध्ये हॅप्पीनेस क्लासमध्ये सहभागी होतील. आमचे शिक्षक, विद्यार्थी आणि दिल्लीकरांसाठी हा खास दिवस आहे. भारत अनेक शतकांपासून जगाला आध्यात्मिकतेची शिकवण देत आला आहे. मला याचा आनंद आहे की, त्या आमच्या स्कूलमधून प्रसन्नतेचा संदेश घेऊन जातील.अमेरिका येथून किती दूर आहे?अमेरिका येथून किती दूर आहे? तिथे पोहचण्यासाठी किती वेळ लागतो? असे प्रश्न एका लहान मुलीने विचारले तेव्हा मेलानिया यांनी काहीच उत्तर दिले नाही.मधुबनी पेंटिंगमधुबनी (मिथिला) शैलीतील पेंटिंग्ज चिमुकल्यांनी मेलानिया यांना भेट दिली. नैसर्गिक रंगांचा वापर आणि वैशिष्ट्यपूर्ण कला म्हणून त्याकडे पाहिले जाते. या पेंटिंग्ज आणि विद्यार्थ्यांसमवेतचा मेलानिया यांचा फोटो मंगळवारी व्हायरल झाला.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMelania Trumpमेलेनिया ट्रम्प