'हॅप्पीनेस क्लास' पाहण्यासाठी मेलानिया ट्रम्प दाखल; केजरीवालांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 13:05 IST2020-02-25T13:05:23+5:302020-02-25T13:05:33+5:30

दिल्लीतील सरकारी शाळेत मागील दीड वर्षापासून हॅप्पिनेस क्लास घेण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष ज्ञान देण्यात येते. त्यामुळे याचे नाव हॅप्पीनेस क्लास ठेवण्यात आले आहे.

Melania Enter Delhi to see 'Happiness Class'; Kejriwal expressed happiness | 'हॅप्पीनेस क्लास' पाहण्यासाठी मेलानिया ट्रम्प दाखल; केजरीवालांनी व्यक्त केला आनंद

'हॅप्पीनेस क्लास' पाहण्यासाठी मेलानिया ट्रम्प दाखल; केजरीवालांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प राजधानी दिल्लीत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या करारासाठी ट्रम्प उपस्थित असून त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प दिल्लीतील शाळेचा दौरा करत आहेत.

मेलानिया ट्रम्प दिल्लीतील मोतीबाग येथील सर्वोदय विद्यालयात दाखल झाल्या आहेत. शाळेत दाखल होताच येथील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मेलानिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी दिल्ली सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट दिली. तसेच याविषयी सविस्तर माहिती घेतली. 

मेलानिया यांनी शाळेला भेट देण्यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिल्लीकरांचे अभिनंदन केले. अमेरिकेच्या प्रथम महिला दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देत आहेत याचा आनंद आहे. आमच्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि दिल्लीकरांसाठी आजचा दिवस खास आहे. अनेक वर्षांपासून भारत जगाला आध्यात्मिकता शिकवत आहे. आमच्या शाळेतून मेलानिया काही तरी संदेश घेऊन जातील, असा विश्वास केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला.

दिल्लीतील सरकारी शाळेत मागील दीड वर्षापासून हॅप्पिनेस क्लास घेण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष ज्ञान देण्यात येते. त्यामुळे याचे नाव हॅप्पीनेस क्लास ठेवण्यात आले आहे.
 

Web Title: Melania Enter Delhi to see 'Happiness Class'; Kejriwal expressed happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.