मेहबुबा मुफ्ती या जिहादीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:28 IST2018-04-27T00:28:56+5:302018-04-27T00:28:56+5:30

अ‍ॅड अंकुर शर्मा असे त्याचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याने जम्मूतूत गुज्जर व बकरवाल या मुस्लीम जमातींवर आर्थिक व सामाजिक बहिष्कार घालावा, असे आवाहनही केले होते.

Mehbooba Mufti or Jihadist | मेहबुबा मुफ्ती या जिहादीच

मेहबुबा मुफ्ती या जिहादीच

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या जिहादी असून, आपल्या इस्लामी अजेंड्यानुसार त्या हिंदुबहुल जम्मू भागांत मुस्लिमांना आणून वसवू पाहत आहेत आणि जम्मूतील लोकसंख्येचे चित्र बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे वादग्रस्त विधान कथुआतील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपींचा खटला लढणाऱ्या वकिलाने केला आहे.
अ‍ॅड अंकुर शर्मा असे त्याचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याने जम्मूतूत गुज्जर व बकरवाल या मुस्लीम जमातींवर आर्थिक व सामाजिक बहिष्कार घालावा, असे आवाहनही केले होते. अ‍ॅड. शर्मा हे बल्त्कारातील आरोपी व माजी सरकारी अधिकारी सांझीरामचे वकील आहेत. त्यांच्या या विधानामुळे हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेहबूबा मुफ्ती या गोहत्येसाठी कत्तलखान्यांना व गोवंशाच्या तस्करीला कायदेशीर संरक्षण देत आहेत. हिंदूबहुल जम्मूमध्ये मुस्लिमांना जमिनी देऊन तिथे त्या राहायला पाठवत आहे. जम्मूची हिंदुबहुल ही ओळखच पुसून टाकण्याचा
त्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Mehbooba Mufti or Jihadist