Mehboob Mufti's atlast sent to his residence but... | मेहबुब मुफ्ती यांची अखेर निवासस्थानी रवानगी पण...

मेहबुब मुफ्ती यांची अखेर निवासस्थानी रवानगी पण...

ठळक मुद्देमेहबुबा मुफ्ती यांची नजरकैद कायम आहे.५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु झालेली त्यांची नजरकैद अद्याप संपलेली नाही.

जम्मू - काश्मीर : जम्मू - काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची रवानगी अखेर घरी करण्यात आली आहे. मात्र, नजरकैदेतून त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. श्रीनगर येथे असलेल्या निवासस्थानी मेहबुबा मुफ्ती परतल्या आहेत. मात्र त्यांची नजरकैद कायम आहे.  

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि आणखी एक माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. ओमर अब्दुल्ला यांना काही दिवसांपूर्वी नजरकैदेतून मुक्त करण्यात आले. मात्र, मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैद कायम आहे.


जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु झालेली त्यांची नजरकैद अद्याप संपलेली नाही. आता फक्त त्यांची रवानगी त्यांच्या श्रीनगर येथील घरी करण्यात आली आहे.

 

 

Web Title: Mehboob Mufti's atlast sent to his residence but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.