अमरसिंह मुलायमसिंह यांना भेटले

By Admin | Updated: August 20, 2014 01:08 IST2014-08-20T01:08:09+5:302014-08-20T01:08:09+5:30

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यांची भेट घेतली़ या भेटीनंतर अमरसिंह यांच्या सपाप्रवेशांच्या चर्चाना आणखी जोर चढला आह़े

Meet Amar Singh Mulayam Singh | अमरसिंह मुलायमसिंह यांना भेटले

अमरसिंह मुलायमसिंह यांना भेटले

लखनौ : राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशातील सत्तारूढ समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यांची भेट घेतली़ या भेटीनंतर अमरसिंह यांच्या सपाप्रवेशांच्या चर्चाना आणखी जोर चढला आह़े सूत्रंच्या मते, अमरसिंहांचा सपाप्रवेश जवळपास निश्चित आह़े सपाच्या तिकिटावर राज्यसभा सदस्यत्व मिळवून ते मागच्या दाराने पक्षात प्रवेश करू शकतात़
मुलायमसिंह यांच्या विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थानी त्यांची ही भेट झाली़ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही यावेळी उपस्थित होत़े सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेचा तपशील प्राप्त झाला नाही़ मात्र या भेटीनंतर अमरसिंह यांनी काहीशा ‘शायराना अंदाजात’ पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिल़े ‘हंगामा है क्यूं बरपा, चोरी तो नही की है, डाका तो नही डाला़, मुलाकात ही तो की है’ असे ते म्हणाल़े मुलायमसिंहांसोबतची आजची भेट अतिशय कौटुंबिक व मैत्रीपूर्ण होती़ यातून माङया सपा प्रवेशाबाबतचे तर्कवितर्क काढले जाऊ नयेत़ मुलायमसिंहांच्या निमंत्रणावरून मी त्यांना भेटायला गेलो़ आमच्यात काय चर्चा झाली, हे माङयाकडून वदवून घ्यायला मी काही नटवरसिंह नाही, अशी गुगली टाकत, भेटीचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला़ (वृत्तसंस्था)
 
4सपाच्या तिकिटावर राज्यसभा निवडणूक लढण्याच्या प्रश्नाला उत्तर देणो अमरसिंह यांनी टाळल़े वाट बघा, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, असे ते म्हणाल़े 

 

Web Title: Meet Amar Singh Mulayam Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.