शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

UP Assembly Election 2022: भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाटच्या कारवर हल्ला, नेमकं काय घडलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 7:02 PM

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाट (Babita Phogat) हिच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाट (Babita Phogat) हिच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एनएआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मेरठ येथे निवडणूक प्रचार करत असताना बबिताच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला. सुदैवानं बबिताला यात कोणतीही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मेरठच्या सिवालखास विधानसभा मतदार संघात दबथुवा गावात ही घटना घडली आहे. बबिता फोगाट भाजपाच्या उमेदवार मनिंदर पाल सिंह यांच्या प्रचारासाठी गावात दाखल झाल्या होत्या. इतक्यात राष्ट्रीय लोक दलच्या (रालोद) समर्थकांनी लाठ्या-काठ्यांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी याचा विरोध केल्यानंतर 'रालोद'च्या समर्थकांनी हल्ला केला. यात भाजपाचे कार्यकर्ते जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 'रालोद'च्या समर्थकांनी महिलांसोबत अभद्र वागणूक केली आणि माझ्या गाडीवरही हल्ला केला, असा आरोप बबिता फोगाट यांनी केला आहे. 

बबिता फोगाट काय म्हणाली?गावात सपा आणि रालोदच्या कार्यकर्त्यांनी उद्धटपणा केला. यात अनेकांना मारहाण झाली आहे आणि एका महिलेचा पाय देखील तुटला आहे. तसंच अनेकांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, असं बबिता फोगाट म्हणाली. यात आपल्या कारवरही रालोदच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं फोगाटनं म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर मला रालोदच्या चौधरी अजित सिंह यांची आठवण झाली. 'ज्या गाडीवर सपाचा झेंडा, समजून जा गाडीत बसला आहे गुंडा', असं ते म्हणायचे. याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असं बबिता म्हणाली. तसंच आपल्या मुली आणि बहिणींना सुरक्षित वातावरण द्यायचं असेल तर जनतेनं भाजपाला मतदान करावं असं आवाहन बबितानं केलं आहे.

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२