शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ३५ वर्षीय मामीचा १६ वर्षांच्या भाचावर जडला जीव; म्हणाली, "आता हाच माझा नवरा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:18 IST

एका ३५ वर्षीय महिलेचं तिच्या अल्पवयीन भाच्यावर प्रेम जडलं. महिला प्रेमात इतकी वेडी झाली की तिला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे. हाच माझा नवरा आहे असं ती सर्वांना सांगत आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेचं तिच्या अल्पवयीन भाच्यावर प्रेम जडलं. महिला प्रेमात इतकी वेडी झाली की तिला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे. हाच माझा नवरा आहे असं ती सर्वांना सांगत आहे. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने या सर्व प्रकाराला विरोध केला तेव्हा महिलेने पोलिसांना बोलावलं. हा आधी माझा भाचा होता पण आता नवरा आहे असं महिलेने सांगितलं. 

महिलेचं ऐकल्यावर पोलिसांनाही मोठा धक्काच बसला. सध्या पोलीस अल्पवयीन मुलाच्या वयाच्या दाखल्याद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. अल्पवयीन मुलगा तिचा भाचा असून तो मेरठमधील दौराला येथील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, महिलेच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं.

अल्पवयीन मुलाला त्यानंतर महिलेला मदत करण्यासाठी तिच्याकडे पाठवण्यात आलं होतं. यामागील हेतू असा होता की तो दिल्लीत राहून एसी-फ्रीजचं काम शिकेल आणि नंतर मेरठला परत येईल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करेल. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत एकत्र राहत असताना महिलेने अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याशी संबंध ठेवले. 

कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला तेव्हा महिलेने पोलिसांना बोलावलं. तिने सांगितलं की आता हा अल्पवयीन मुलगाच तिचा नवरा आहे आणि यापुढे ती त्याच्यासोबत राहणार आहे. महिलेच्या या विधानामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी मोठ्या कष्टाने दोन्ही बाजुच्या लोकांना समजावून सांगून शांत केलं. मात्र अद्याप हे प्रकरण मिटलेलं नाही. मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचं वय १६ वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस