धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:02 IST2025-04-11T18:58:03+5:302025-04-11T19:02:40+5:30

एका MBBS च्या विद्यार्थ्याचा त्याच्याच कॉलेजमध्ये उपचाराविना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

medical college where he was supposed to study MBBS did not provide treatment Student dies | धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू

धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच कॉलेजमध्ये उपचाराविना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. 

या विद्यार्थ्याचे नाव अभिनव पांडे आहे. तो पटना येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. ७ एप्रिल रोजी अभिनव पांडे पटना येथील हट्टाली मोरजवळ एका रस्ते अपघातात बळी पडले. त्याला आधी जखमी अवस्थेत आयजीआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले. 

२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...

या प्रकरणात विद्यार्थ्यानी आरोप आहे की, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्याला दाखल करण्यात आले नाही. यानंतर अभिनवला पाटण्यातील पारस या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांनी संचालकांच्या घराला घेराव घातला

अभिनवच्या मृत्यूची बातमी पसरताच आयजीआयएमएसच्या विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरला. वैद्यकीय विद्यार्थी असूनही अभिनवला त्याच्या स्वतःच्या संस्थेत उपचार सुविधा मिळू शकल्या नाहीत, जे अत्यंत दुर्दैवी आहे, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला. अभिनवला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

शिवाय, विद्यार्थ्यांनी असाही आरोप केला आहे की जेव्हा त्यांनी अभिनवचा मृतदेह त्याच्या घरी नेण्यासाठी आयजीआयएमएस संचालकांकडून रुग्णवाहिका मागितली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या असंवेदनशीलतेला कंटाळून विद्यार्थ्यांनी संचालकांच्या निवासस्थानाला घेराव घातला आणि संपावर गेले.

घटनास्थळावर परिस्थिती पाहून शास्त्री नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आरोग्यमंत्र्यांना घटनास्थळी बोलावण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम राहिले आणि त्यांनी निषेध सुरूच ठेवला.

Web Title: medical college where he was supposed to study MBBS did not provide treatment Student dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार