शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लोक बुडत असताना एका व्यक्तीसाठी सरदार सरोवर भरले, मेधा पाटकर यांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:53 IST

सरदार सरोवरातील पाण्याची पातळी वाढवण्यावरून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - सरदार सरोवरातील पाण्याची पातळी वाढवण्यावरून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार सरोवरामधील पाण्याची पातळी मुदतीआधीच वाढवण्यात आली, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला. सरदार सरोवर धरणातील पाण्याची पाकऴी वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून टीका करताना  त्या म्हणाल्या,"धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील हजारो गावकरी पाण्याखाली जात असताना केवळ नरेंद्र मोदींसाठी धरणातील पाण्याचा पातळी वाढवली गेली. त्यामुळे मध्य प्रदेशातील धरण्याच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांना फटका बसला आहे.''  सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांचे अद्याप पूनर्वसन झालेले नाही. यावेळी धरणातील पाण्याची पातळी मुदतीआधीच वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबरला असतो म्हणूनच मुदतीआधी धरणातील पाणी पातळी वाढवली गेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापितांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही, असा आरोपही पाटकर यांनी केला.  मेधा पाटकर पुढे म्हणाल्या की, "गुजरात सरकारने सरदार सरोवरातील पाण्याची पातळी 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येईल, असे सांगितले होते. पुढे ही तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात मोदींच्या वाढदिवशीच 17 सप्टेंबर रोजी धरणातील पाण्याची पातळी वाढवली गेली. हजारो नागरिक धरणाच्या वाढत्या पाण्यात बुडत असताना केवळ एका व्यक्तीसाठी धरणातील पाणी वाढवले गेले. त्यामुळेच आम्ही आंदोलकांनी मोदींचा वाढदिवस धिक्कार दिवस म्हणून साजरा केला, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.  

टॅग्स :DamधरणWaterपाणीMedha Patkarमेधा पाटकरNarendra Modiनरेंद्र मोदी